लगाम मध्ये रंगल्या बिरसा मुंडा व्हॉलीबॉल स्पर्धा.
पोलीस विभागाचा उपक्रम
या क्रीडा व नृत्य कौशल्याला मिळाली चालना
क्रिष्णा गावडे तालुका प्रतिनिधी
.गडचिरोली जिल्ह्यातील पोलिस स्टेशन अहेरी , पोलीस चौकी लगाम च्या वतीने जनजागरण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले त्या मध्ये विविध स्पर्धा चे आयोजन करण्यात आले होते पोलीस अधीक्षक गडचिरोली निलोत्पल अप्पर पोलीस अधीक्षक गडचिरोली अनुज तारे अप्पर पोलीस अधीक्षक गडचिरोली कुमार चिंता यांचे प्रेरणेने व उप विभागीय पोलीस अधिकारी अहेरी अमोल ठाकूर यांच्या मार्गदर्शनातून व पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून पोलीस स्टेशन अहेरी अंतर्गत दिनांक 20.11.2022 रोजी सकाळी 10.00वा पोलीस स्टेशन हद्दीतील मौजा लगाम येथे पोलीस चौकी लगाम येथील भव्य पटांगणात जनजागरण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले त्या मध्ये भव्य बिरसा मुंडा व्हालीबॉल स्पर्धा आयोजन करण्यात आले मान्यवरांच्या हस्ते प्रथम बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस दीप प्रज्वलन व माल्याअर्पण करून सदर स्पर्धेची सुरुवात करण्यात आली सदर बिरसा मुंडा व्हॉलीबॉल स्पर्धे मध्ये पोलीस स्टेशन मुलचेरा हद्दीतील एकूण 18 संघाने सहभाग नोंदविला आदिवासी युवकांच्या अंगी असलेला कलागुणांना वाव देऊन उत्कृष्टरित्या आपल्या कलागुणांचे सादरीकरण करून भव्य बिरसा मुंडा व्हॉलीबॉल स्पर्धेमध्ये आर डी व्हॉलीबॉल संघ नागेपल्ली प्रथम क्रमांक पटकाविला द्वितीय क्रमांक जय सेवा व्हॉलीबॉल संघ धनुर तृतीय क्रमांक व्हॉलीबॉल संघ ब गट चुटूगुंटा तिन्ही स्पर्धेमध्ये प्रत्येकी तिन्ही संघ यांनी आपल्य खेळाचे सादरीकरण करून अनुक्रमे प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक पटकविला तिन्ही स्पर्धेच्या विजेता संघास पोलीस स्टेशन अहेरी वतीने अनुक्रमे 3000रु 2000रु 1000रु असे रोख पारितोषिक तसेच शिल्ड व प्रमाणपत्र देऊन त्यांच्या सत्कार करण्यात आला स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकवीणाऱ्या संघास उपविभागीय स्तरावर आपणास खेळण्यास संधी मिळेल असे पोलीस उप निरीक्षक अमर मुल्ला यांनी सांगितले तसेच पुढील स्पर्धेकरिता त्यांना प्रोत्साहित करून शुभेच्छा दिल्या सदर स्पर्धा कार्यक्रमास मौजा लगाम ग्रामपंचायतचे सरपंच दीपक मडावी उपसरपंच मधुकर गेडाम ग्रा.पं सदस्य राजभाऊ पंबलवार तंटामुक्ती अध्यक्ष श्रीकृष्ण गावडे व्यसनमुक्ती अध्यक्ष सुधाकर मडावी जोगदास कुसनाके दुशांत पेंदाम पोलीस उप निरीक्षक अमर मुल्ला पोलीस सापोनि पंकज बोंडसे कृपानंद भोयर दिगंबर गलबले सुनील तोरे हेमराज वाघाडे पोलिस स्टॉप पोलीस पाटील गिरमाजी मडावी सुरेश मडावी सर्व गावातील पोलीस पाटील व गावातील प्रतिष्ठित नागरिक विद्यार्थी विद्यार्थिनी गावकरी नागरिक उपस्थित होते पोलीस स्टेशन अहेरी पोलीस उपनिरीक्षक अमर मुल्ला यांनी कार्यक्रमास उपस्थित स्पर्धेक व नागरिकांना यांना गडचिरोली पोलीस दला अंतर्गत पोलीस दादालोरा खिडकी माध्यमातुन राबवण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजना तसेच विविध प्रशिक्षणाबाबत सविस्तर माहिती दिली तसेच सदर योजनेच्या जास्तीत जास्त युवकांनी लाभ घ्यावा असे आवाहनही केले सदर स्पर्धेकरिता पोलीस स्टेशन अहेरी हद्दीतील 200ते 300 नागरिक विध्यार्थी उपस्थित होते सदर भव्य बिरसा मुंडा जनजागरण स्पर्धा कार्यक्रम यशस्वी रिते पार पाडण्याकरिता पोलीस स्टेशन अहेरी चे सर्व अधिकारी व अंमलदार यांनी अथक परिश्रम घेतले.

