एम जे एफ आष्टी येथीलखेलो इंडिया च्या मैदानावर धनुर्विद्या
स्पर्धा संपन्न
उपसंपादक प्रविण तिवाडे वैनगंगा वार्ता
आष्टी येथील महात्मा ज्योतिबा फुले हायस्कूल मध्ये खेलो इंडियाच्या मैदानावर दिनांक 18 ते 19 /11/ 22 पर्यंतच्या दरम्यान जिल्हास्तरीय धनुर्विद्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून जिल्हा क्रीडा अधिकारी प्रशांत दोंडल तर अध्यक्ष म्हणून महात्मा ज्योतिबा फुले हायस्कूलचे प्राचार्य शैलेंद्र खराती हे होते प्रमुख पाहुणे म्हणून महात्मा ज्योतिबा फुले कला महाविद्यालय आष्टीचे प्राचार्य,संजय फुलझेले,तालुका क्रीडा अधिकारी धनश्याम वरारकर ,पर्यवेक्षक के जी बैस, रोशन साळूंखे हे होते.मान्यवरांनी मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पुजन करून दिपप्रज्वलन केले त्यानंतर जिल्हा क्रीडा अधिकारी गडचिरोली यांनी विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावर यश संपादन करा असे आवाहनही केले त्यानंतर प्राचार्य संजय फुलझेले अध्यक्ष प्राचार्य शैलेंद्र खराती यांनीसुद्धा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व शुभेच्छा दिल्या यावेळी झालेल्या स्पर्धेत विविध खेळाडूंनी सहभाग दर्शवला होता त्यामध्ये विजय ठरलेले विद्यार्थी स्वरूप लखमापूरे,संतोष जागरवार,दीपक सेमले ,अनिल डोके, अनुष्का वाळके, नेहा औतकार,दर्शन मोहूर्ले, गुंजन चतुर ,निशा सरकार, रागिनी बावणे, रोशनी पुंगाटी,आदित्य जुनघरे, जगती गुरुकार, बाळू पिंपळशेंडे, मनस्वी बामनकर ,प्रथा हुलके, अस्मिता हुलके, कल्याणी वाकुडकर,विशाखा आत्राम रोशनी जागरवार इत्यादी खेळाडूंनी प्राविण्य प्राप्त केले या कार्यक्रमात चामोर्शी येथील आरोग्य पथक डॉक्टर शेषराव भैसारे श्री कुशल कवठेकर व योगेश पिपरे रमेश दयालवार अनिल पिसे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन कला महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण विभागाचे प्रमुख श्याम कोरडे यांनी केले तर आभार प्रदर्शन हायस्कूलचे शारीरिक शिक्षक सुशील अवसरमोल यांनी केले.

