३ लाख ७० हजाराचा मोह सडवा व दारू जप्त

0
३ लाख ७० हजाराचा मोह सडवा व दारू जप्त


अशोक खंडारे संपादक वैनगंगा वार्ता

        कुरखेडा तालूक्यातील साधूटोला, अरततोंडी व डिप्राटोला येथील अवैध हातभट्ट्यावर धडक कार्यवाही चे सत्र सूरूच असून आज अतिसंवेदनशील व दूर्गम भागातील चवेला येथे धडक देत कूरखेडा पोलीसानी येथे सूरू असलेल्या ४ अवैध मोहफुल दारूचा हातभट्टयावर धडक देत ३ लक्ष ७० हजाराचा मोह सडवा व दारू जप्त करीत चार आरोपीना अटक केली व जप्त करण्यात आलेला माल घटणास्थळावरच नष्ट केला
     कूरखेडा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या चवेला येथे मोठ्या प्रमाणात अवैध मोह फूलाचा दारूच्या हातभट्टया आहेत व येथूनच तालूक्याचा अन्य ठिकाणी दारूचा पूरवठा होत असल्याची गूप्त माहीती उपविभागीय अधिकारी साहिल झरकर याना मीळताच त्यानी पोलीस चमूचे गठन करीत चवेला धडक दिली यावेळी गावालगत असलेल्या जगंलात ४ अवैध मोह फूलाचा हातभट्टया आढळून आल्या येथून एकूण १ हजार लिटर मोह दारू व १७०० लिटर मोह सडवा एकूण किमंत ३ लाख ७० हजार जप्त करण्यात आला व पंचा समक्ष सर्व माल घटणास्थळावरच नष्ट करण्यात आला या संदर्भात आरोपी बिसन शिवलाल मडावी (५५)प्रकाश पंडीत नैताम (४०) रणजित तानू हिचामी (३८) आनंदराव कलीराम मडावी (५०) यांचा विरोधात भादवि महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५(इ) ६५(फ) अन्वये गून्हा दाखल करीत सर्व आरोपीना अटक केली धडक कार्यवाही उपविभागीय पोलीस अधिकारी साहील झरकर यांचा मार्गदर्शनात साहायक पोलीस निरीक्षक दिनेश गावंडे पोलीस उपनिरीक्षक कूलदिप सोनटक्के पोलीस उपनिरीक्षक देवराव भांडेकर पोलीस हवालदार विनोद बोगा पोलीस हवालदार गौरीशंकर भैसारे पोलीस नाईक मनोहर पूराम, खुशाल वालदे शिपाई ललीत जांभूळकर यांचा चमूने केली

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !