फुले महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना दिले आत्मसंरक्षणाचे धडे

0
फुले महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना दिले आत्मसंरक्षणाचे धडे 



अशोक खंडारे संपादक वैनगंगा वार्ता


आष्टी - वन वैभव शिक्षण मंडळ अहेरी द्वारा संचलित गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली संलग्नित महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग व विशाखा विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांना आत्म संरक्षण याविषयी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संजय फुलझले होते. उपस्थित विद्यार्थ्यांना कराटे प्रशिक्षक मा. कपिलजी मसराम यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. व्यक्तिगत जीवनात व्यक्तीला येणाऱ्या अडचणींना प्रसंगाना तोंड देण्यासाठी आणि परिस्थितीवर मात करून मार्ग काढण्यासाठी आत्मसंरक्षण करण्याकरिताच्या उपाययोजना आणि कृलुप्त्या मार्गदर्शक कपिल मसराम यांनी सांगितल्या. कार्यक्रमाचे संचालन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ.राजकुमार मुसने यांनी, प्रास्ताविक प्रा. ज्योती बोबाटे यांनी केले तर उपस्थितांचे आभार कल्याणी ताजने हिने मानले.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !