युवारंग महापुरुषांच्या विचारांचा वारसा जपणारे संघटन पोलीस उपनिरीक्षक विलास करंगामी पो.स्टे.तुमसर

0
युवारंग महापुरुषांच्या विचारांचा वारसा जपणारे संघटन

  पोलीस उपनिरीक्षक विलास करंगामी  पो.स्टे.तुमसर


संपादक वैनगंगा वार्ता
अशोक खंडारे

आरमोरी :- नेहमी सामाजिक ,शैक्षणिक क्रीडा, आरोग्य, सांस्कृतिक क्षेत्रात नाविन्यपूर्ण उपक्रम घेणाऱ्या युवारंग तर्फे उराडी येथे निशुल्क अभ्यासिकेचे उद्घाटन दिनांक २३ नोव्हेंबर २०२२ला दुपारी  १२:३०वाजता करण्यात आले या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून मा. बोळणे सर कढोली , कार्यक्रमाचे अध्यक्ष पोलीस उपनिरीक्षक विलास करंगांमी 
तुमसर तर  मार्गदर्शक म्हणून संस्थापक तथा अध्यक्ष युवारंग राहुल जुआरे , चारुदत्त राऊत तर  प्रमुख अतिथी म्हणून  क्षीरसागर महाराज ,पुस्तोडे सर, भास्करजी वैरागडे पो. पा. उराडी , पत्रुजी नारनवरे ,मडावी सर ,खोडवे सर ,हेमके सर ,काटंगे सर, धक्काते सर, ठाकरे सर ,तीनघसे साहेब ,मनोज सहारे , शरणागत मॅडम आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी अध्यक्षस्थानी मार्गदर्शनात मा विलासजी करंगामी साहेब यांनी युवारंग च्या माध्यमातून मागील ३ वर्षांपासून सुरू असलेल्या निशुल्क ट्युशन क्लासेस मुळे गावातील विद्यार्थ्यांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाचनाची आवड निर्माण झाली आहे तर या निशुल्क अभ्यासिकेतून उराडी गावातून मोठे अधिकारी बनून देशाच्या विकासात मोठे क्रांतिकारी बदल घळून येतील युवारंग नेहमी सामाजिक ,आरोग्य, क्रीडा, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रात नाविन्यपूर्ण उपक्रम घेत असते उराडी सारख्या लहान गावात उन्हाळ्यात समर कॅम्प  सारखी नाविन्यपूर्ण कल्पना राबवून संपूर्ण जिल्ह्यात एक नावीन्यपूर्ण उदाहरण प्रस्तुत केले नेहमी गरजू रुग्णांना निशुल्क रक्तदान करून जीवनदान देण्याचे काम सुद्धा नेहमी युवारंग करत असते या कार्यक्रमाचे संचालन साहिल वैरागडे तर आभार राधेश्याम दडमल यांनी केले याप्रसंगी या कार्यक्रमाला उराडी गावातील विद्यार्थी व पालक वर्ग  युवारंग चे सदस्य उपस्थित होते.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !