१९ हजाराचा मुहेमाल जप्त
दोन आरोपी जेरबंद.
उपसंपादक प्रविण तिवाडे
पारशिवनी:- पारशिवनी तालुकातिल पारशिवनी पोस्टें च्या हदीतील मौजा सावली शिवार येथिल देवराव बिहुणे यांचे शेता जवळ बोरी च्या पाटाच्या बाजु ला पश्चिमेस १५ कि मि अतरावर पारशिवनी पोलिस स्टेशन चे पो उप निरिक्षक ज्ञानबा पलनाते व सिपाई रुपेश राठौड यांची सोमवार ३१ ऑक्टोबरला १२ वाजता च्या दरम्यान मोहाफुलाच्या दारूभट्टीवर पोलिसांनी धाड टाकून १९.०९६ हजार रुपयाचे मुद्देमाल जप्त केला . असुन आरोपी भीमराव धनराज चौधरी ( ४० ) व ईश्वर मधुकर वरकडे ( ३५ , दोन्ही रा . कोथुळणा , ता . सावनेर ) अशी आरोपींची नावे आहेत .
सावली शिवारात मोहफूल दारूभट्टी सुरू असल्याच्या माहितीवरून पोलीस उपनिरीक्षक ज्ञानबा पळनाते व सिपाई रूपेश राठोड यांनी धाड टाकली असता आरोपी भीमराव धनराज चौधरी यांच्या सांगण्यावरून आरोपी ईश्वर मधुकर वरखडे हा मोहफुलाची दारू काढताना आढळला . त्याच्या ताब्यातून मोहफूल सोडवा व दारू असा एकूण १ ९ हजार ९ ६ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला . उर्वरित नष्ट करण्यात आला . पोलीस निरीक्षकां राहुल सोनवने यांच्या मार्गदर्शनात दोन्ही आरोपी ईश्वर वरकडे, भिमराव चौधरी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून कलम मादक द्रव्य कायदा चे कलम ६५( क) ( इ) ( फ ) स ह कलम भा दं सं चे कलम १०९ प्रमाणे गुन्हा तक्रारदार पोसि रूपेश राठोड यांची तक्रारी वरून दाखल करण्यातआला असुन पो नि राहुल सोनवने यांचे मार्गदर्शनात . ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक ज्ञानोबा पळनाटे , पोलीस अंमलदार रूपेश राठोड यांनी केली असुन पढील तपास सुरू आहे .


