शेतशिवरा जवळ वाघाने केली गायीची शिकार
जिल्हा परिषद माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी वनविभागाला महिती दिली
अशोक खंडारे संपादक वैनगंगा वार्ता
📝अहेरी तालुक्यातील इंदाराम ग्राम पंचायत अंतर्गत येत असलेल्या गेर्रा येथील रहिवासी नामे मल्ला देबूडू अर्का यांच्या गायीवर गावा नजीकच शेतशिवरा जवळ रस्त्यावरच वाघाने हल्ला करून गाय ठार केली
हि घटना सकाळी उघडळीस आली असुन संपुर्ण गावात भितीचे वातावरण निर्माण झाले या घटनेची महिती माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांना देताच घटनास्थळावर जावून पाहणी करुन वन विभागाला महिती दिली
अश्या प्रकारच्या अनेक घटना घडत असल्याने सदर वाघाचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा असे वन विभागाच्या अधिकाऱ्यांना यावेळी सांगण्यात आले यावेळी वनपाल शहारे , वनरक्षक कुमारे , तेजूभाऊ दुर्गे, प्रकाश पेंदाम, चिन्नु अर्का, जलपत अर्का, पांडु अर्का, गंगाराम तोर्रेम, अजय अर्का,साईनाथ अर्का,लक्ष्मण आत्राम, उपस्थित होते

