श्री सद्गुरू साईबाबा महाविद्यालयात महात्मा फुले पुण्यतिथी साजरी
अशोक खंडारे संपादक वैनगंगा वार्ता
श्री साईबाबा ग्रामीण विकास संस्था गडचिरोली द्वारा संचालित श्री सद्गुरू साईबाबा विज्ञान वाणिज्य महाविद्यालयात दिनांक 28 /11/ 2022 रोजी राष्ट्रीय सेवा योजना विभागांतर्गत महात्मा ज्योतिबा फुले पुण्यतिथी साजरी करण्यात आली कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्र प्राचार्य डॉ पी के सिंग अध्यक्ष म्हणून उपस्थित होते तर प्रमुख अतिथी म्हणून रासेयो चे सह कार्यक्रमाधिकारी प्रा सुबोध साखरे डॉ अपर्णा मारगोनवार डॉ दीपक नागापुरे प्रा महेश शिल्लमवार प्रा सचिन मुरकुटे प्रा जया रोकडे प्रा राहुल आवारी प्रा कवींद्र साखरे हे उपस्थित होते डॉ अपर्णा मारगोनवार यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमे ला हार अर्पण करून मार्गदर्शन करताना सांगितले की महात्मा ज्योतिबा फुले यांनी बहुजन समाजा वर्णव्यवस्थेच्या गुलामगिरीतून बाहेर काढण्यासाठी पहिल्यांदा शिक्षणाचा पाया रचून विज्ञानवादी व प्रयत्नावादी विचार जसे बालविवाह बंदी समाजातील अज्ञान अंधश्रद्धा व समाजाला जागृत करण्यासाठी आपले पूर्ण आयुष्य न्याय हक्क मिळवून देण्यासाठी संघर्ष केला ते एक समाज सुधारक म्हणून त्यांनी जे कार्य केले त्यांच्या कार्यातून विद्यार्थ्यांनी प्रेरणा घ्यावी असे विचार व्यक्त केले डॉ दीपक नागापुरे यांनी कार्यक्रमाचे संचालन केले तर आभार प्रदर्शन डॉ प्रकाश राठोड यांनी केले या कार्यक्रमाला महाविद्यालयातील डॉ एम पी सिंग डॉ प्रदीप कश्यप डॉ सोनाली धवस प्रा सुबोध साखरे प्रा महेश शिलमवार प्रा कवेंद्र साखरे प्रा राहुल आवारी संदीप मानापुरे रवींद्र झाडे कुमारी शुभांगी डोंगरे विजय खोब्रागडे अविनाश जीवतोडे उषाबाई माहूर पवार व मोठ्या संख्येने रासेयो विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते

