मासेमारी करीता गेलेल्या युवकाचा नदीत बुडाल्याने मृत्यु
प्रविण तिवाडे उपसंपादक
वैनगंगा वार्ता
सिरोंचा गोदावरी नदी पात्रात नावेच्या सहाय्याने मासेमारी करीत असताना नाव अचानक उलटल्याने युवक नदीत बुडाल्याची घटना आज, गुरुवारी दुपारी 2 वाजताच्या सुमारास घडली. तोटा (22) रा. कंबलपेठा असे नदीत बुडालेल्या युवकाचे नाव आहे. असरअल्ली पोलिसांद्वारे शोधमोहिम राबविण्यात आली असून सायंकाळी उशिरापर्यंत युवकाचा मृतदेह आढळून आला नसल्याची माहिती आहे.