ऑटोमोबाईलचे दुकान आगीत स्वाहा
रात्रो ९.२० ची घटना
अशोक खंडारे संपादक वैनगंगा वार्ता
लगाम येथील टुव्हिलर ऑटोमोबाईल चे दुकान आगीत स्वाहा झाल्याची घटना दि. ६ नोव्हेंबर च्या रात्री ९.२० वाजता घडली .
सदर दुकान श्रीनिवास बिस्वास रा.लगाम यांचे असून आग लागल्याचे माहीत होताच दुकान मालक व ग्रामस्थ यांनी आग विझविण्याचा आटोकाट प्रयत्न केला मात्र प्रयत्न करुनही दुकान आगीने आपल्या कवेत घेतल्याने पुर्णपणे दुकान जळून खाक झाले
दुकान मालकाचे लाखो रुपयाचे नुकसान झाल्याचे चित्र दिसत आहे . बिस्वास यांना शासकीय मदत मिळावी अशी मागणी होत आहे आग कशामुळे लागली याचे कारण कळू शकले नाही

