नगर पंचायत आम्हाला पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणार काय

0
नगर पंचायत आम्हाला पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणार काय? 



 तेजल झाडे उपसंपादक वैनगंगा वार्ता

 अहेरी नगर पंचायत येथील प्रभाग क्र. 14.16 व 17 मुरूम  खदान गअहेरी, गडबामणी व चेरपल्ली या प्रभागात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणार काय असा प्रश्न वार्डातील नागरिकांना पडला असून, पिण्याचे पाणी टँकरने पुरवठा करावे अशी मागणी केली आहे 
प्रभाग क्र.16.17 गडअहेरी, गडबामणी व चेरपल्ली या ठिकाणी ग्रामीण पाणी पुरवठा योजनेअंतर्गत पाणीपुरवठा होत होता. परंतु रोज काही ना काही बिघाडाचे कारण सांगून पाणीपुरवठा विभागामार्फत पाणी सोडल्या जात नाही. त्यामुळे प्रभाग क्र.16.17 तील जनतेला पिण्याच्या पाण्यासाठी दोन ते तीन किमी अंतरावर पायपीट करून पाणी आणावे लागत आहे.
        तसेच प्रभाग क्र.14 मुरूम खदान व प्रभाग क्र.16 व 17 गडअहेरी, गडबामणी, चेरपल्ली हे गाव नगरपंचायत क्षेत्रात येत असून येथे पाणीपुरवठा करण्याची सोय करणे हे नगरपंचायतीचे कर्तव्य आहे. गावातील बोरवेल ला मुबलक प्रमाणात पाणी नाही. त्यामुळे पिण्याच्या पाण्याकरिता वरील प्रभागातील जनतेला नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
         करिता नगर पंचायत,अहेरी मार्फत वरील प्रभागाकरिता पाण्याची टाकीची सोयकरून देण्यात यावी व पाणी टाकीची सोय होईपर्यंत टँकर द्वारे पिण्याचे पाणी पुरवठा करण्यात यावा
वरील प्रभागामध्ये तीन दिवसाच्या आत टॅंकरने पाणीपुरवठा न केल्यास घागर मोर्चा काढून प्रशासनाचे लक्ष वेधण्यात येईल. दि.21-11-2022 पर्यंत टॅंकरने पाणीपुरवठा सुरू न केल्यास 22-11-2022 रोजी 11 वाजता मोर्चा काढण्यात येईल असा इशारा  अमोल मुक्कावार, राहुल दुर्गे, अॅड  पंकज दहागावकर,  प्रभाकर कुसराम, अक्षय आत्राम सह व वार्डवासीयांनी निवेदनाद्वारे दिला आहे .

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !