गडचिरोली न.प.येथील गृहकर कमी करा
अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाची निवेदनाद्वारे मागणी
अशोक खंडारे संपादक वैनगंगा वार्ता
गडचिरोली नगर पालिकेनी गृहकर कमी करावा अशी मागणी अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाच्या वतीने निवेदन देऊन करण्यात आली आहे.
अखिल भारतीय गरिपब्लिकन पक्ष गडचिरोली च्या वतीने नगर परिषद गडचिरोली ने शहरातील गृहकर वाढ केली शहरातील सर्व सामान्य गोरगरीब जनतेला हि वाढ परवडणारी नाही गोरगरीब जनता आपले उदरनिर्वाह करीत असतांना त्यांना मोठी कसरत करावी लागत आहे त्यामध्ये नगर पालिकेनी गृहकर वाढ केली ते उपाशी रहा पण गृहकर भरा हे चुकीचे आहे
त्या विरोधात अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाचे वतीने उपकार्यकारी अधीकारी भंडारवार न. प गडचिरोली यांना निवेदन देऊन वाढीव कर कमी करण्याची विनंती करण्यात आली निवेदन देताना अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष रोहीदास राऊत प्रदेश उपाध्यक्ष प्राचार्य प्रकाश दुधे प्रदेश सचिव प्रा. राजन बोरकर प्रदेश उपाध्यक्षा सुरेखाताई बारसागडे जिल्हा अध्यक्ष हंसराज उंदिरवाडे प्रदेश सचिव केशवराव सामृतवार , गडचिरोली विधान सभा क्षेत्र प्रभारी प्रदिप भैसारे , कार्यालयीन सचीव अशोक खोब्रागडे जि.सरचिटणीस महिला आघाडी ज्योती उंदिरवाडे शहर अध्यक्ष अनिल बारसागडे, गोपाल चौधरी, तुकाराम रामटेके, विवेक वाकडे, जिवन आत्राम उपस्थित होते


