सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण...
वैनगंगा वार्ता
चंद्रपुर जिल्हा ..1/11/2022 बांधकामाचे बिले मंजूर करण्यासाठी चंद्रपूर
जिल्ह्यातील जिवती उपविभागात कार्यरत अभियंत्याला ठेकेदाराकडून बिलापोटी दोन लाखाची लाच घेतांना रंगेहाथ पकडण्यात आले.
अटक करण्यात आलेल्या अभियंत्याचे नाव अनिल जगन्नाथ शिंदे वय 27 वर्ष असून हा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जिवती उपविभागात वर्ग 2 मध्ये नियुक्त होता. तक्रारदार व्यक्तीने बांधकाम केलेल्या चार कामातील बिलातून दोन कामाचे बिल मंजूर करण्यासाठी या अभियंत्याने दोन लाखाची लाच मागितली होती.
फक्त 27 वर्ष वय असलेल्या या अभियंत्याने दोन लाखाची मागणी केली अडल्यावरुन, बांधकामात किती आलबेल प्रकार सुरु असेल याचा विचार न केलेलाच बरा...
सदर कारवाईत एसीबी चे पोलिस अधीक्षक मधुकर गीते यांच्या मार्गदर्शनात पोलिस उप अधीक्षक अविनाश भामरे यांच्या नेतृत्वाखाली ही धाडसी कारवाई करण्यात आली होती. पुढील तपास पोलिस उप अधीक्षक अविनाश भामरे यांच्या कडे सुपूर्द करण्यात आले आहे.

