राजीव गांधी फाऊंडेशनचा विदेश देणग्या घेण्याचा
मार्ग बंद
केंद्र सरकारचा काँग्रेसला धक्का
संपादक अशोक खंडारे मो.7972434925
केंद्र सरकारने काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे. राजीव गांधी फाउंडेशन (आरजीएफ) चे परदेशातून फंड घेण्याचे लायसन रद्द केले आहे. परदेशी योगदान (नियमन) कायद्यांतर्गत गृह मंत्रालयाने राजीव गांधी फाउंडेशन चा परवाना रद्द केला आहे. राजीव गांधी फाउंडेशन वर विदेशी निधीचा गैरवापर केल्याचा आरोप आहे.
राजीव गांधी फाउंडेशन हे गांधी कुटुंबाशी संबंधित संस्था आहे. फाउंडेशनवर विदेशी निधी कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे. अशी माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिल्याच्या समोर आले. गृहमंत्रालयाच्या चौकशी समितीच्या अहवालाआधारे ही कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
जुलै २०२० मध्ये गृह मंत्रालयाने ही चौकशी समिती स्थापन केली होती. माझी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी या फाउंडेशनच्या अध्यक्ष आहेत. तर इतर विश्वस्तामध्ये माजी पंतप्रधान मनमोहन सिंग माझी अर्थमंत्री पी चिदमबर, काँग्रेस खासदार राहुल गांधी आणि काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी वड्रा यांचा समावेश आहे.
