*उपरी जंगल परिसरात वाघाच्या हल्ल्यात गुराखी गंभीर जखमी*
उपसंपादक प्रवीण तिवाडे
बातम्या व जहीराती करीता संपर्क साधा
सावली-
सावली वनपरिक्षेत्रातील व्याहाड खुर्द उपवन परिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या उपरी जंगल परिसरात स्वतःच्या म्हशी चरायला नेले असता खुशाल कवडू शेट्ये वय 50 वर्ष,यांचेवर वाघाने हल्ला करून गंभीर जखमी केले. या घटनेची माहिती जंगल परिसरात जवडपास असलेल्या लोकांना कडताच आरडाओरड करीत घटनास्थळाकडे धाव घेतली त्यामुळे वाघ तिथुन पळाला.जखमी गुराख्यास त्वरित गडचिरोली येतील शासकीय रुग्णालयात दाखल केले.सदर घटना आज दुपारी 3 वाजताच्या दरम्यान घडली. या घटनेमुळे गावात भीतीचे वातावरण पसरले आहे.
व्याहड बूज ते काढोली या रस्त्यालगत अनेक गावे असून वसलेली सर्व गावे ही जंगल परिसरात असल्याने अनेकदा सदर रस्त्यावर वाघ असो की बिबट यांचे हल्ले होऊन काही मृत्यू तर काही जखमी झाले असल्याने वनविभागावर परिसरातील जनतेकडून रोष व्यक्त केला जात आहे
सध्या हलके धान कापणीला सुरुवात झाली असून शेतकऱ्यांच्या शेत्या या जंगलपरिसरात असल्याने वन्यप्राण्यांच्या दाहशतीत धान कापणी सुरू असल्याने वनविभागानि वन्यप्राण्यांचा त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी उपरी येथील उपसरपंच आशिष मनबतुलवार यांनी केली आहे
,

