उपसंपादक प्रवीण तिवाडे
चंद्रपुर
आजच्या आधुनिक राजकारणात प्रत्येक राजकीय व्यक्ती आपल्या मतदार संघातील मतदाता असेल, ज्याच्याकडे जातीय समीकरणाची वोट बँक असेल किंवा एखादा प्रतिष्ठित पदाधिकारी असेल तर त्याच्या प्रत्येक पदाधिकारी मानसन्मान करतो परंतु माजी केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहिर यांच्या आपलेपणा व साधेपणा एकदा पुन्हा दिसून आलेला आहे निमित्त होते दिवाळीनिमित्त पूर्वी हंसराज अहिर चंद्रपूर गडचिरोली या लोकसभेचे प्रतिनिधित्व करत होते त्यानिमित्त आष्टी येथील प्रा. डॉ.भारत पांडे हे त्यांचे कार्यकर्ते होते परंतु काही काळानंतर गडचिरोली आणि चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ वेगवेगळे झाले तरी त्यानंतर हंसराज अहिर यांची नाळ आजपर्यंत गडचिरोली मतदार संघातील कार्यकर्त्यांची तुटलेली नाही आणि म्हणूनच प्रा. डॉ.भारत पांडे नेहमीच आष्टी परिसरातील अनेक समस्या घेऊन त्यांच्याकडे जात असतात त्याच्या अनुषंगाने दिवाळीनिमित्त ते आपल्या मुक्ता या दहा वर्षाचा मुली सोबत त्यांना भेटायला गेले असता त्यांनी समस्या तर एकूणच घेतले परंतु त्यासोबत दिवाळीला भेटायला आली म्हणून कार्यालयात काम करणारे अनेक कर्मचारी असताना त्यांनी स्वता मुक्ताला विचारपूस करून तिला स्वतःच्या हाताने दिवाळीच्या फराळ भरून ताट दिली आणि तिला माहिती विचारून घेऊन दिवाळीच्या व भावी जीवनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या स्वतः दोनदा खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री असताना कार्यालयात काम करणारे कर्मचारी असताना आपला जुना कार्यकर्ता आपल्या मुलीसोबत भेटायला येतो आणि त्याला तेवढाच प्रतिसाद देऊन त्या मुलीला स्वतःच्या हाताने फराळाची प्लेट बनवून देणे पाण्याची बॉटल देणे यावरून त्यांच्या आपलेपणा आणि साधेपणा दिसून येतो आजही राजकारणात अशा लोकांची गरज आहे की जी मतदार संघापुरतच मर्यादित असतात मतदारसंघांमध्ये तर कामाच्या व्यक्ती असेल त्याची विचारपूस होते अन्यथा कोणाचीही विचारपूस होत नाही आणि म्हणून सर्व राजकीय पक्षातील पदाधिकाऱ्यांनी यांच्याकडून राजकीय बोध घेण्याची आवश्यकता आहे असेच विचार आपलेपणा प्रत्येक राजकीय पार्टी करू लागली तर त्या पदाधिकाऱ्याला काम करणाऱ्या कार्यकर्त्याची कमी पडणार नाही आणि पैशाची ही गरज राहणार नाही आणि म्हणून सर्वत्र माजी केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहिर यांच्या या वागणुकीचे कौतुक होत आहे.

