जातीवादी पक्षाला सत्तेपासुन रोखा रा. यू.काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांचे आवाहन

0
जातीवादी पक्षाला सत्तेपासुन रोखा


 रा. यू.काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांचे आवाहन

अशोक खंडारे संपादक
वैनगंगा वार्ता

आलापल्लीत शरद युवा संवाद यात्राभारतीय जनता पार्टी जातीवादी पक्ष असून येत्या निवडणुकीत त्यांना सत्तेपासून रोखा असे आवाहन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख यांनी केले.
     ते शुक्रवार 28 ऑक्टोबर रोजी अहेरी नजीकच्या आलापल्लीच्या क्रीड़ा संकुल येथे शरद युवा यात्रेच्या चौथा टप्प्यात प्रमुख मार्गदर्शकच्या स्थानावरुन बोलत होते.
    यावेळी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी आमदार धर्मराव बाबा आत्राम होते. तर प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष ऋतुराज हलगेकर, जिल्हाध्यक्ष रविंद्र वासेकर, रायूकाँचे विभागीय अध्यक्ष (नागपुर विभाग) नितिन भटारकर, जिल्हाध्यक्ष लीलाधर भरडकर, रा. काँ.चे विधानसभा अध्यक्ष लक्ष्मण येरावार, तालुकाध्यक्ष श्रीनिवास विरगोनवार, रायुकाँ चे तालुकाध्यक्ष स्वप्निल श्रीरामवार, सिरोंचाचे तालुकाध्यक्ष मधुकर कोल्लूरी, नगरसेवक अमोल मुक्कावार, रायुकां सिरोंचा तालुकाध्यक्ष एम.डि.शानू, नागेपल्लीचे उपसरपंच मलरेड्डी येमनुरवार आदी मान्यवर उपस्थित होते.
     पुढे बोलताना महेबूब शेख म्हणाले की, मोदी सरकारने जनतेची फसवणूक करून देशात सत्ता मिळविली असून आता भाजपाकडे कोणतेच मिशन नसून केवल हिन्दू-मुस्लिम तेढ़ निर्माण करुण जातीय रंग द्यायचे आणि सत्ता काबिज करायचे हेच एकसूत्री कार्यक्रम असून अशा जातीवादी पक्षाला केंद्रात व राज्यात सत्तेत बसवीणे धोक्याचे नव्हे तर मोठे घातक आहे. याची खबरदारी व सावधगिरी प्रत्येक नागरिकांनी बाळगुन येत्या निवडणुकीत भाजपा पक्षाला सत्तेपासून रोखा असे आवाहन करून महेबूब शेख यांनी संसारपयोगी व जीवनावश्यक वस्तुंचे भाव दिवसेंदिवस कसे वाढत आहे याविषयी मोदी सरकारचे खरपुस समाचार घेऊन मोदी सरकारवर व भाजपा पक्षावर सडकुन टिका केले. आणि इडिवरही टिकास्त्र सोडले.
    अध्यक्षीय स्थानावरुन आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी, राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष अंशी टक्के समाजकारण आणि उर्वरित केवळ विस टक्के राजकारण करीत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात शेतकरी, शेतमजूर, कामगार, गोरगरीब युवक, युवती, महिलांचे हित साधणारे पक्ष असून या पक्षाचे विचार, ध्येय-धोरणे गावागावात पोहचवून बूथ कमिट्या मजबूत करा व संघटन वाढवा असे म्हणत आ.धर्मराव बाबा आत्राम यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.
   यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष रविन्द्र वासेकर यांनी विचार व्यक्त करून युवकांची स्फूर्ति वाढविले.
    शरद युवा संवाद यात्रेचे प्रस्ताविक राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष लीलाधर भरडकर यांनी तर सूत्रसंचालन कैलास कोरेत यांनी केले. उपस्थितांचे आभार स्वप्निल श्रीरामवार यांनी मानले.
यावेळी राष्ट्रवादी युवक कांग्रेस पक्षाचे अहेरी, आलापल्ली, सिरोंचा,मुलचेरा येथील पदाधिकारी, कार्यकर्ते व बहुसंख्येने युवक उपस्थित होते.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !