भाऊबीज सानुग्रह अनुदानासाठी आशा वर्कर्स व गट प्रवर्तक कर्मचाऱ्यांची आमदारांना ओवाळणी
अशोक खंडारे संपादक
वैनगंगा वार्ता
वडसा :--- आशा वर्कर्सनी कोविड महामारीच्या संकटकाळी आपल्या जिवावर उदार होऊन सेवा दिली,त्यामुळे राज्यातअनेक आशानां संसर्ग होऊन आपला जीव गमवावा लागला.त्यांच्या या बलिदानामुळेच कोविड महामारीचा मुकाबला करता आला, केंद्र व राज्य सरकारांची मान उंचावली.या आशा वर्कर्सच्या या कामाचे दस्तुरखुद जागतिक आरोग्य संघटनेने ( W.H.O.) भरभरुन कौतुक केले.त्या आशा वर्कर्स व गटप्रवर्तक कर्मचा-यांनी आज दि.28 आक्टोंबरला किमान एक महिण्याचा मानधन भाऊबीज भेट म्हणुन देण्यात यावे यासाठी आयटक संघटनेच्या आवाहनावर वडसा तालुक्यातील आशा व गटप्रवर्तकांनी आमदार कृष्णा गजभे यांच्या वडसा येथील कार्यालयावर जाऊन भाऊबीज निमित्त चक्क ओवाळणी आंदोलन केला. य़ाआंदोलनाचे नेत्रुत्व आयटक चे राज्य सचिव कॉ विनोद झोडगे यांच्या मार्गदर्शनात संघटनेच्या ज्योत्स्ना रामटेके,दीपिका गुरणुले, फर्जणा शेख,विद्या सहारे,वंदना गुडाधे,निर्मला घोनमोडे,रत्नमाला गेडाम,लता नंदेश्वर,वर्षा राजूरकर,हिरकण्या रामटेके,संध्या बोदेले यांनी केले. आमदार कार्यालयात सजवलेल्या आरतीच्या थाळी द्वारे आमदारांना टिका लावुन व पेढा भरवुन ओवाळण्यात आल्यानंतर आमदार महोदयांनी उपस्थित असलेल्या आशा व गटप्रवर्तकांना संबोधित करतांना आशा वर्कर्स चे कार्य कोविड काळात अत्यंत मोलाचे होते.तेव्हा आपली मागणी योग्य आहे.त्यामुळे मी स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडवणीस यांच्याशी बोलनी करेन सरकारनी तुमच्या मानधनात वाढ करावी या साठी प्रयत्न करणार असल्याचे जाहीरपणे आश्वासन दिले.
