रस्त्याने पायदळ जात असलेल्या इसमास भरधाव बुलेटची जब्बर धडक पादचारी ठार

0
रस्त्याने पायदळ जात असलेल्या इसमास भरधाव बुलेटची जब्बर धडक पादचारी ठार 

अनोळखी इसमाची ओळख पटविण्याचे पोलीसांसमोर आव्हान 


 गोंडपिपरी : -  अतीजलद वेगाने बुलेट चालवून 
रस्त्याने पायी जाणाऱ्या व्यक्तीला जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात एका अनोळखी व्यक्तीचा मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना ८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास गोंडपिपरी-आष्टी महामार्गावरील कन्यका राईस मिलसमोर घडली. अपघातानंतर जखमी अवस्थेत पडलेल्या व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती मृत घोषित केले.
मिळालेल्या माहितीनुसार, विठ्ठलवाडा येथून गोंडपिपरीकडे एक व्यक्ती पायी जात होती. याचदरम्यान गोंडपिपरीकडून येणाऱ्या विनानंबरच्या रॉयल एनफिल्ड बुलेटने पादचाऱ्याला जोरदार धडक दिली. धडक इतकी जबरदस्त होती की, बुलेटवरील चालकाचे नियंत्रण सुटले आणि बुलेटसह तो रस्त्याच्या विरुद्ध दिशेला जाऊन पडला. या अपघातात पादचारी व्यक्तीसह बुलेटचालकही जखमी झाला.

अपघाताचा आवाज ऐकताच घटनास्थळी नागरिकांची गर्दी जमली. तेथे उपस्थित असलेल्या प्रत्यक्षदर्शीनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तातडीने रुग्णवाहिका बोलावून गंभीर जखमी पादचाऱ्याला ग्रामीण रुग्णालय, गोंडपिपरी येथे उपचारासाठी दाखल केले. मात्र, मृत्यूशी सुरू असलेली त्याची झुंज अपयशी ठरली. संबंधित व्यक्तीची ओळख पटू शकली नसल्याने त्याच्या नातेवाइकांचा शोध घेण्याचे आव्हान निर्माण झाले आहे.

या प्रकरणी बुलेटचालक समीर नितीन काकडे (वय २२), रा. विठ्ठलवाडा, ता. गोंडपिपरी याच्याविरुद्ध गोंडपिपरी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम २८१, १०६ (१) तसेच मोटार वाहन कायद्याच्या कलम १८४ अन्वये गुन्हा नोंदविला आहे. पुढील तपास गोंडपिपरी पोलीस करीत आहेत.
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !