विराट किल्ल्याच्या विहिरीत पडून पहारेकरी कामगाराचा मृत्यू
परिवारावर कोसळले दुःखाचे डोंगर
वैरागड :-
गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी तालुक्यापासून
१२ किलोमीटर अंतरावर येत असलेल्या वैरागड येथे पौराणिक आणि पुरातत्व विभाग अंतर्गत येत असलेल्या आणि विराट राजाचा गड किल्ला म्हणून प्रसिद्ध असलेल्या किल्ल्यातील विहिरीमध्ये वैरागड येथील रहिवासी आणि पुरातत्व
विभाग अंतर्गत किल्याचा पहारेकरी असलेल्या कामगाराचा किल्ल्यातील विहिरीत पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना दिनांक ९/११/२०२६ रोजी सकाळी ९ वाजताचे सुमारास घडली. सोनू माधव पिठाले अंदाजे वय २३ वर्ष रा. वैरागड असे मृतकाचे नाव आहे
प्राप्त झालेल्या माहितीनुसार वैरागड येथील पुरातत्त्व विभागाअंतर्गत येत असलेल्या पौराणिक आणि विराट राजाचा गड किल्ला म्हणून प्रसिद्ध असलेल्या किल्ल्याच्या कामावर पहारेकरी कामगार म्हणून शासनाच्या वतीने सोनू माधव
पिठाले वय ३२ वर्ष हा युवक ५ वर्षापासून किल्ल्याच्या कामावर होता अशी माहिती मिळाली आहे नेहमी प्रमाणे तो ९/११/२०२६ रोजी सकाळी आपल्या किल्ल्याच्या कामावर गेला काही किल्ल्यातील कामे करीत असताना आणि विहिरीजवळून जात असताना त्याचा अचानक विहिरीत तोल गेल्याने तो विहिरीमध्ये पडला आणि त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला अशी माहिती प्राप्त झाली आहे.

