लॉयड्स राज विद्या निकेतन शाळेतील शिक्षक दांपत्यानी गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा
नागपूरच्या रेवतीनगर येथील घटना
गडचिरोली:-
गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील हेडरी येथील 'लॉयड्स राज विद्या निकेतन' शाळेत कार्यरत असलेल्या शिक्षक दाम्पत्याने नागपुरातील रेवतीनगर येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
मनीष प्रल्हाद गणवीर वय ३८ वर्षे आणि सोनाली मनीष गणवीर वय ३५ वर्षे अशी मृत शिक्षक दांपत्यांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे हे दाम्पत्य नागपुरातील मनीष यांच्या वडिलांच्या घरी गेले होते. शनिवार ७ नोव्हेंबर ला दुपारी त्यांच्या घरातून मोठमोठ्याने भांडणाचे आवाज ऐकू येत होते अशी जनमानसात चर्चेला उधाण आले होते नंतर रविवारी ८ नोव्हेंबरला सकाळी नातेवाईक भेटायला आले असता घर आतून बंद आढळले. खिडकीतून डोकावून पाहिले असता दोघेही शयनकक्षात पंख्याला लटकलेल्या अवस्थेत दिसून आले.
मनीष आणि सोनाली यांनी पूर्वीच्या जोडीदारांपासून घटस्फोट घेतल्यानंतर, याच वर्षी ३१ ऑगस्ट २०२६ रोजी न्यायालयीन विवाह केला होता. दोघेही अत्यंत मेहनती व अभ्यासू शिक्षक म्हणून ओळखले जात होते.
या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून बेलतरोडी पोलीस ठाण्याचे पथक घटनेचा पुढील तपास करीत आहेत. या घटनेमुळे गडचिरोली व नागपूर शैक्षणिक वर्तुळात तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे

