पेट्रोल पंपा समोर दोन दुचाकींची समोरासमोर जब्बर धडक; दोन ठार तर एक गंभीर

0


पेट्रोल पंपा समोर दोन दुचाकींची समोरासमोर जब्बर धडक; दोन ठार तर एक गंभीर 




वैनगंगा वार्ता १९ 

आष्टी (अशोक खंडारे):-
 चामोर्शी तालुक्यातील आष्टी येथे चामोर्शी रोड एचपी पेट्रोल पंपा समोर दोन दुचाकींची आमोरासमोर जब्बर धडक झाली या अपघातात दोघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना आज दि १० नोव्हेंबर ला दुपारच्या सुमारास घडली 
अचानक घडलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे 

अपघाताची माहिती मिळताच आष्टी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेंद्र वाघ व पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली व परिसरातील नागरिकांनी माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेत जखमींना मदत केली. जखमींना तातडीने लॉईड मेटलच्या रुग्णवाहिकेने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले 
  राजू येलमुले वय ५३ वर्षे रा. अनखोडा व आठ नंबर येथील श्याम विश्वास असे मृत व्यक्तीचे नाव आहे व संदीप राजू येलमुले वय २३ वर्षे रा.अनखोडा मे गंभीर जखमी असून त्याला चंद्रपूर येथील रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले आहे अपघाताच्या घटनेमध्ये अनखोडा येथील पोस्ट मास्टर यांचा मृत्यू झाला त्यामुळे गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे सदर बापलेक हे अनखोडा वरून आष्टी कडे येत होते व श्याम विश्वास हे आष्टी वरून आपल्या गावाकडे जात होते दरम्यान पेट्रोल पंपाजवळ अपघात झाला. आष्टी पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवले अधिक तपास पोलिस निरीक्षक महेंद्र वाघ यांच्या मार्गदर्शनात पोलीस करीत आहेत
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !