देव मधुकर गोंगलेचे प्रज्ञा शोध परीक्षेत सुयश

0

देव मधुकर गोंगलेचे प्रज्ञा शोध परीक्षेत सुयश



अहेरी:-
मॉडर्न एज्युकेशन सोसायटी द्वारा 25 एप्रिल 2026 मध्ये राणी दुर्गावती कन्या शाळेत घेण्यात आलेल्या महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षेत भगवंतराव प्राथमिक तथा माध्यमिक आश्रम शाळा राजाराम (खां) येथील देव मधुकर गोंगले यांनी जिद्द व मेहनतीच्या जोरावर घवघवीत सुयश मिळवले आहे. तो सामान्य शेतकरी कुटुंबातील असून आई लताबाई मधुकर गोंगले,वडील मधुकर गोंगले हे राष्ट्रीय युवा ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष आहेत. सर्व प्रथम श्रेय जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेचे इयत्ता ४ थी चे वर्ग शिक्षण रामदास उघाडे व जी के मडावी यांचे गणित विषयात मोलाचे मार्गदर्शन लाभले. देवाच्या यशाचे श्रेय मार्गदाता इंदाराम येथील मामा इम्रानखान पठाण यांनी मला नेहमी सुखादुःखात साथ दिली तसेच नेहमी देवाच्या अभ्यासा बद्दल नेहमी मार्गदर्शन करणारी आत्या फरीन इम्रानखान पठाण यांना दिले आहे. तद्वतच आई , वडील, शाळेचे मुख्याध्यापक शिक्षकवृंद यांना दिले आहे 
देव मधुकर गोंगले यांनी प्रज्ञा शोध परिक्षेत घवघवीत यश संपादन केल्याबद्दल परिसरातील नागरिकांनी त्याचे अभिनंदन केले आहे
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !