२५ सप्टेंबरला बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांची जयंती होणार थाटामाटात साजरी
गडचिरोली-- अखिल भारतीय रिपब्लिकन पक्ष जिल्हा गडचिरोलीच्या वतीने दिनांक २५ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ९ वाजता गडचिरोली येथील इंदिरा गांधी चौकात रिपब्लिकन चळवळीचे सरसेनानी तथा राज्यसभेचे माजी उपाध्यक्ष बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या जयंती निमित्त अभिवादन करण्यात येणार आहे
पक्षाचे केंद्रीय उपाध्यक्ष रोहिदास राऊत , जिल्हाध्यक्ष हंसराज उंदीरवाडे प्रदेश सचिव प्राचार्य प्रकाश दुधे महिला आघाडी नेत्या सुरेखाताई बारसागडे, प्रदेश उपाध्यक्ष प्रा. राजन बोरकर, विधान सभा प्रमुख प्रदीप भैसारे इत्यादी मान्यवर याप्रसंगी उपस्थित राहतील. या कार्यक्रमा नंतर चांदेकर भवन येथे कार्यकर्त्यांची बैठक आयोजित केली असून त्यात रिपब्लिकन पक्षाचा इतिहास व भविष्य या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात येईल.
या कार्यक्रमांना कार्यकर्ते व नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा सरचिटणीस प्रल्हाद रायपुरे, कार्यालय सचीव अशोक खोब्रागडे महिला आघाडी जिल्हाध्यक्ष नीता सहारे , युवक आघाडीचे नरेंद्र रायपुरे शहर अध्यक्ष अनिल बारसागडे, आदींनी केले आहे

