चपराळा वन्यजीव अभयारण्यात फुलपाखरू सर्वेक्षण करण्यासाठी गेले विद्यार्थी

0
 चपराळा वन्यजीव अभयारण्यात फुलपाखरू सर्वेक्षण करण्यासाठी गेले विद्यार्थी 

 श्री सद् गुरु साईबाबा विज्ञान महाविद्यालयाचा उपक्रम 



आष्टी : ताडोबा अंधारी वाघ्र प्रकल्प, चंद्रपूर,उपवनविभागीय वन अधिकारी, आलापल्ली तसेच श्री सद् गुरु साईबाबा विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, आष्टी येथील प्राणिशास्त्र विभाग व महात्मा ज्योतिबा फुले,कला महाविद्यालय,आष्टी यांच्या संयुक्त विद्यमाने चपराळा वन्यजीव अभयारण्य येथे फुलपाखरू सर्वेक्षण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या अभ्यास दौऱ्यात महाविद्यालयातील प्राणिशास्त्र विषयाचे प्रा. महेशकुमार सिलमवार, बी. एस. सी अंतिम व प्रथम वर्षाचे विद्यार्थी उस्फुर्त पणे सहभागी झाले.या उपक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना फुलपाखरांचे विविध प्रकार, त्यांचे अधिवास, जीवनचक्र तसेच पर्यावरणातील त्यांचे महत्त्व याबाबत प्रत्यक्ष अनुभवातून माहिती मिळवून देणे हा होता. या अभ्यास दौऱ्यात प्रमुख मार्गदर्शक मिलिंद उमरे, मानद वन्यजीव रक्षक, संजय शेगावकर, ज्येष्ठ निसर्ग अभ्यासक यांनी विद्यार्थ्यांना चपराळा अभयारण्य परिसरात आढळणाऱ्या  विविध प्रजातींच्या फुलपाखरांचे सर्वेक्षण करून त्यांच्या रंग, आकार, वैशिष्ट्ये व अधिवासाची माहिती दिली. उपक्रमातून एकूण 24 फुलपाखरांचे सर्वेक्षण करण्यात आले.या उपक्रमादरम्यान विद्यार्थ्यांना जैवविविधता संवर्धन, पर्यावरणाचे संरक्षण आणि निसर्गसंपदेचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. फुलपाखरे ही परिसंस्थेतील महत्त्वाची घटक असून पर्यावरणीय समतोल राखण्यात त्यांची भूमिका महत्त्वपूर्ण असल्याचे वन अधिकाऱ्यांनी व्यक्त केले. या अभ्यास दौऱ्यामध्ये अंजली कुळमेथे, अध्यक्ष, ग्रीन्स, गडचिरोली,  मुकेश भांदककर, मानद वन्यजीव रक्षक, चंद्रपूर तसेच उपक्रमाचे आयोजक मंगेश बाळापुरे, उप विभागीय वन अधिकारी (वन्यजीव) आल्लापल्ली, जी. एम. लांडगे वन परिक्षेत्र अधिकारी,वनपरिक्षेत्र (वन्यजीव) चौडमपल्ली, सी.व्ही.सडमेक क्षेत्र सहाय्यक मार्कंडा यांचे विशेष सहकार्य लाभले. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत निसर्गाच्या सान्निध्यात प्रत्यक्ष निरीक्षणाचा अनुभव घेतला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण होऊन जैवविविधतेच्या 
संवर्धनाची भावना दृढ झाली.
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !