वैनगंगा नदीत मद्यधुंद इसमाने मारली उडी , एस डी आर एफ च्या जवानांनी वाचविले प्राण

0

वैनगंगा नदीत मद्यधुंद इसमाने मारली उडी , एस डी आर एफ च्या जवानांनी वाचविले प्राण 



आष्टी (अशोक खंडारे)## चामोर्शी तालुक्यातील आष्टी येथील वैनगंगा नदीमध्ये आज दि .८ सप्सटेंबर सकाळच्या सुमारास जुन्या पुलावरुन एका मद्यधुंद तरुणाने उडी मारली. त्या ठिकाणी असलेल्या मच्छीमारांनी उडी मारतांना बघितले अशी माहिती मिळाली.पाण्याच्या प्रवाहात तो वाहून जात असताना नदीत मध्यंतरी असलेल्या खडकाजवळ तो अडकून पडला. तब्बल नऊ तास तो पाण्यात अडकून पडला. त्याला वाचविण्यासाठी दुपारी दोन युवकांनी नदीपात्रात उडी घेतली. मात्र तिघेही त्याठिकाणी अडकून पडले . नदीला पाणी भरपूर असल्याने त्यांना बाहेर निघता येईना. शेवटी प्रसंगावधान दाखवून आष्टी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेंद्र वाघ यांनी गडचिरोली येथील एस डी आर एफ च्या जवानांना पाचारण केले. दुपारी २.०० वाजता या पथकाने नदीमध्ये जाऊन एक तासाच्या प्रयत्नाने त्या तिघांनाही अखेर सुखरुप बाहेर काढले.
त्या इसमाचे नाव देविदास(धोंडू ) मानपल्लीवार , वय ४५ वर्ष, रा.आष्टी असे आहे. 
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !