साक्षरतेच्या माध्यमातून सामाजिक परिवर्तन शक्य : प्राचार्य डॉ. डी. एम. माटे
आष्टी : श्री सद्गुरू साईबाबा विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, आष्टी येथे आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनानिमित्त
विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य माननीय डॉ. डी. एम. माटे होते. प्रमुख पाहुणे म्हणुन डॉ.पी. के. सिंग, डॉ.एम.पी.सिंग, प्रा.जया रोकडे मंचावर उपस्थित होते.
साक्षरता ही केवळ अक्षर ज्ञानापुरती मर्यादित नसून चांगले शिकलेले व्यक्ती समानता व असमानता ची व्याख्या समजू शकते,साक्षरता व्यक्तीच्या सर्वांगीण विकासासाठी आणि सामाजिक परिवर्तनासाठी अत्यंत महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन
प्राचार्य डॉ. डी.एम. माटे यांनी केले. विद्यार्थ्यांनी शिक्षणातून मिळणाऱ्या ज्ञानाचा उपयोग समाजाच्या विकासासाठी करावा तसेच प्रत्येक व्यक्तीपर्यंत शिक्षण आणि ज्ञान पोहोचविण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजन व प्रास्ताविक वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख डॉ. अपर्णा मारगोनवार यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विक्रम सिकदर यांनी केले तर आभार प्रदर्शन स्मित गोहने यांनी केले.यावेळी महाविद्यालयातील इतर प्राध्यापकवृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या माध्यमातून ‘साक्षर समाज, सक्षम समाज’ हा संदेश देण्यात आला.

