आष्टी येथील घरफोडीत १८३००० रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी केला लंपास

0

आष्टी येथील घरफोडीत १८३००० रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी केला लंपास 


आष्टी (अशोक खंडारे):-
चामोर्शी तालुक्यातील आष्टी येथील घरफोडीत १८३००० रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केल्याची घटना दि ४ सप्टेंबर ला दुपारच्या सुमारास उघडकीस आली 
आष्टी येथील विलास गजानन बंडावार वय ६७ वर्षे, रा. आष्टी, ता. चामोर्शी, जि. गडचिरोली असे असून हे दिनांक 20/08/2026 रोजी पत्नीसह डोळ्याचे ऑपरेशन करण्यासाठी गडचिरोली येथे गेले होते ते दिनांक 04/09/2026 रोजी दुपारी 12.00 वाजताचे सुमारास घरी परतले तेव्हा घराचे दाराचा कुलूप तोडलेला आढळला. लाकडी पेटी व लोखंडी आलमारीतून सोन्याचे दागिने व इतर साहित्य वस्तू एकूण किंमत १,८३,००० रु किंमतीचे चोरीस गेल्याचे निदर्शनास आले आहे. त्याबाबत आष्टी पोलीस स्टेशनमध्ये तोंडी रिपोर्ट नोंदवला असून पोलिसांनी पंचनामा करून गुन्हा नोंद केला आहे. सदर घरफोडीचा तपास पोलीस निरीक्षक महेंद्र वाघ यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक शेळके करीत आहेत
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !