श्री सद्गुरू साईबाबा विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय येथे स्वयं शासन दिनाचे आयोजन
आष्टी (अशोक खंडारे):-
श्री सद्गुरु साईबाबा विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, आष्टी येथे विद्यार्थी विकास विभागा तर्फे ५ सप्टेंबर शिक्षक दिनानिमित्त स्वयंशासन दिनाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांतर्गत वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी एका दिवसासाठी शिक्षकाची भूमिका स्वीकारून अध्यापनाचे कार्य केले. कार्यक्रमाची सुरुवात भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दिप प्रज्वलीत करून करण्यात आले. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून डॉ. पी. के. सिंग, प्रमुख अतिथी डॉ. अपर्णा मारगोनवार, डॉ. सोनाली ढवस, प्रा सचिन मुरकुटे मंचावर उपस्थित होते. स्वयंशासन दिनाच्या माध्यमातून
विद्यार्थ्यांनी विविध विषयांचे अध्यापन करून शिक्षकाची भूमिका आणि जबाबदारी अनुभवली. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, आत्मविश्वास, वक्तृत्वकौशल्य व जबाबदारीची भावना विकसित होण्यास मदत झाली. यावेळी उत्कृष्ट अध्यापन मध्ये बी.एस.सी अंतिम वर्षाचे विद्यार्थी नयन सदन प्रथम तर विक्रम सिकदर यांनी द्वितीय क्रमांक पटकाविल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. शिक्षक दिनाचे महत्त्व सांगताना शिक्षक हे विद्यार्थ्यांच्या जीवनाला योग्य दिशा देणारे मार्गदर्शक असल्याचे प्रतिपादन कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. पी. के. सिंग यांनी केले. डॉ.अपर्णा मारगोनवार आणि प्रा. सचिन मुरकुटे हे या उपक्रमाचे परीक्षक होते.
कार्यक्रमाचे आयोजन विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. महेश सिलमवार यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विक्रम सिकदर तर आभार प्रदर्शन स्मित गोहणे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील इतर प्राध्यापक वृंद डॉ. एम. पी. सिंग, डॉ प्रदीप कश्यप,डॉ. दिपक नागापुरे, प्रा. सुबोध साखरे, प्रा. जया रोकडे, प्रा.कविंद्र साखरे, प्रा.राहुल आवारी, प्रा. रवींद्र भुरसे तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी रविंद्र झाडे, सविता गारगाटे, अविनाश जिवतोडे, विजय खोब्रागडे, शुभांगी डोंगरे, रमेश वागदरकर,उषाताई माहूरपवार, पौर्णिमा गोहणे, नितु शेंडे आदींनी सहकार्य केले.

