गडचिरोली पोलीस विभागात निवड झालेल्या समीर कोल्हे व तेजस गुंफलवार यांच्या पालकांचा सन्मान

0
गडचिरोली पोलीस विभागात निवड झालेल्या समीर कोल्हे व तेजस गुंफलवार यांच्या पालकांचा सन्मान

नवनिर्माण गणेश उत्सव मंडळ सायगावचा स्तुत्य उपक्रम


आरमोरी : गडचिरोली पोलीस विभागात निवड झालेल्या गरीब व होतकरू युवक समीर कोल्हे व तेजस गुंफलवार यांच्या यशाबद्दल नवनिर्माण गणेश उत्सव मंडळ, सायगाव यांच्या वतीने त्यांच्या पालकांचा महाकाल्याच्या दिवशी विशेष सत्कार करण्यात आला.

समीर कोल्हे यांचे पालक वनिता व सुकदेव कोल्हे तसेच तेजस गुंफलवार यांचे पालक वर्षाताई व दिवाकर गुंफलवार या दाम्पत्यांचा चंदुभाऊ प्रधान, नायब तहसीलदार व गणपत कोपुलवार, ज्येष्ठ नागरिक यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.

या सत्कार सोहळ्यात युवकांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून मिळविलेल्या यशाचे कौतुक करण्यात आले. ग्रामीण भागातील होतकरू युवकांनी शिक्षण, मेहनत व जिद्दीच्या बळावर विविध क्षेत्रांत यश संपादन करावे, असा संदेश यावेळी देण्यात आला.

चंदुभाऊ प्रधान नायब तहसीलदार यांचे मनोगत

यावेळी चंदुभाऊ प्रधान, नायब तहसीलदार म्हणाले, “ग्रामीण भागातील गरीब व होतकरू मुलांनी आपल्या कष्टाच्या आणि जिद्दीच्या जोरावर मिळविलेले यश ही संपूर्ण गावासाठी अभिमानाची बाब आहे. समीर कोल्हे आणि तेजस गुंफलवार यांनी प्रतिकूल परिस्थितीत मेहनत करून गडचिरोली पोलीस विभागात मिळविलेली निवड निश्चितच कौतुकास्पद आहे. त्यांच्या यशामागे त्यांच्या पालकांचे संस्कार, त्याग आणि प्रोत्साहन आहे. त्यामुळे आज त्यांच्या पालकांचा सन्मान करणे ही आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. गावातील इतर युवकांनीही या दोघांकडून प्रेरणा घेऊन स्पर्धा परीक्षांची तयारी करावी आणि आपल्या कुटुंबासह गावाचे नाव उज्ज्वल करावे.”

या कार्यक्रमाला मंडळाचे पदाधिकारी रामकृष्ण प्रधान, खेमराज प्रधान, आनंदराव दुमाने, लव्हाजी कांबळे, नारायण प्रधान, गजानन मेश्राम, श्यामराव मेश्राम , रवींद्र दुमाने, सदाशिव कोपुलवार, नानाजी प्रधान, विजय पोहणकर, धनराज डुंबरे, मोहन दुमाने, प्रकाश प्रधान, यशवंत राऊत, टीकाराम प्रधान, हरिश्चंद्र कांबळे, सूरज प्रधान, प्रभाकर माकडे, मारोती माकडे, हरिभाऊ माकडे, लक्ष्मण प्रधान यांच्यासह मंडळाचे सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.

नवनिर्माण गणेश उत्सव मंडळाच्या या उपक्रमाचे ग्रामस्थांकडून कौतुक करण्यात आले.
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !