संजीव रामटेके यांची महाराष्ट्र काँग्रेस कमेटीच्या अनुसूचित जाती काँग्रेस सेलच्या राज्य कार्यकारणीवर निवड

0

संजीव रामटेके यांची महाराष्ट्र काँग्रेस कमेटीच्या अनुसूचित जाती काँग्रेस सेलच्या राज्य कार्यकारणीवर निवड 


गडचिरोली; सामाजिक व सांस्कृतिक कार्यात नेहमी सक्रिय असणारे देसाईगंज (वडसा) येथील संजीवजी आत्माराम रामटेके यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या अनुसूचित जाती सेलच्या राज्य कार्यकारणीमध्ये सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. ही निवड अखिल भारतीय काँग्रेस पक्षश्रेष्टी, अनुसूचित जाती विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष गौतमजी पाल तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष डॉ. अनिरुद्ध वनकर यांच्या नेतृत्व व मार्गदर्शनाखाली करण्यात आली. संघटनेकरिता तसेच विविध कार्यात अग्रेसर राहणारे कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख आहे. प्रेस मालक व नाट्य कलावंत म्हणून संजीव रामटेके यांनी शेकडो नाटकातून विविध भूमिका साकारल्या आहेत. नाटकाच्या माध्यमातून मनोरंजन व प्रबोधन करणाऱ्या एका सच्चा कलावंतांची ,सामान्य कार्यकर्त्याची दखल घेऊन एकूणच त्यांच्या कर्तृत्वामुळे पक्षश्रेष्ठींनी केलेली 
राज्य कार्यकारणीवरील निवडीमुळे त्यांचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. संजीव रामटेके यांची राज्य कार्यकारीणी सदस्यपदी निवड झाल्यामुळे ज्येष्ठ रंगकर्मी डॉ .अनिरुद्ध वनकर, डॉ. राजकुमार मुसणे, डॉ.शेखर डोंगरे, युवराज गोंगले, हंसराज लांडगे, प्रियंका गायधने, प्रल्हाद मेश्राम, सिने. भारत रंगारी, ताजूल उके, विपिन राऊत, सुशील रामटेके व समस्त कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !