उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असलेला आष्टी अप्पर तहसील कार्यालय नामंजूर

0
उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असलेला 
आष्टी अप्पर तहसील कार्यालय नामंजूर 

२२ सप्टेंबरच्या शासन आदेशात आष्टीचा उल्लेख नसल्याने नागरिकांमध्ये प्रश्नचिन्ह; ३४ ते ४५ किलोमीटरचा प्रवास टाळण्याची मागणी


 आष्टी :- (अशोक खंडारे) चामोर्शी तालुक्यातील सर्वात मोठे गाव म्हणून आष्टीची ओळख आहे व आष्टी येथे अप्पर तहसील कार्यालय मंजुरही झाले होते फक्त उद्घाटनाच्या प्रतीक्षेत होते असे असतानाही नाव नसने हा आष्टी परिसरातील जनतेवर अन्याय करणारा निर्णय घेण्यात आला आहे 
आष्टी परिसरातील नागरिकांच्या प्रशासकीय सोयीसाठी अप्पर तहसील कार्यालय सुरू करण्याचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. २२ सप्टेंबर रोजी जारी झालेल्या शासन आदेशात आष्टीचा स्पष्ट उल्लेख नसल्याने परिसरातील नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त होत असून, आष्टीला अप्पर तहसील कार्यालय सुरू करण्याच्या प्रक्रियेला नेमका विलंब का होत आहे? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

महसूल व इतर प्रशासकीय कामांसाठी आष्टी परिसरातील नागरिकांना सुमारे ३४ किलोमीटरचा प्रवास करून चामोर्शी येथे यावे लागते तसेच काही गावांतील नागरिकांना ४० ते ४५ किलोमीटर अंतर पडतो आहे त्यामुळे नागरिकांचा वेळ, प्रवासाचा खर्च आणि श्रम वाया जात आहेत. विशेषतः ग्रामीण भागातील नागरिकांना वारंवार चामोर्शी गाठणे गैरसोयीचे ठरत असल्याचे सांगण्यात येत आहे.

शासन आदेशात आष्टीचा उल्लेख का नाही?

आष्टी येथे अप्पर तहसील कार्यालय सुरू करण्याची मागणी असताना २२ सप्टेंबरच्या शासन आदेशात आष्टीचा उल्लेख नसल्याने या प्रक्रियेबाबत स्पष्टता देण्याची मागणी होत आहे. कार्यालय सुरू करण्यास प्रशासकीय पातळीवर कोणती प्रक्रिया बाकी आहे, त्याला विलंब कुठे होत आहे आणि पुढील निर्णय कधी होणार? याबाबत संबंधित प्रशासनाने स्पष्ट भूमिका मांडावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

नागरिकांची दीर्घकाळची गैरसोय लक्षात घेऊन शासनाने आष्टीचा स्पष्ट समावेश करून अप्पर तहसील कार्यालय सुरू करण्याबाबत तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

आष्टी परिसरातील गावे, नागरिकांची संख्या आणि भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता स्थानिक पातळीवर प्रशासकीय सुविधा उपलब्ध होणे आवश्यक असल्याची मागणी होत आहे.
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !