खेळाला जीवनाचा अविभाज्य अंग बनवा- प्राचार्य डॉ.अनिता लोखंडे
आष्टी:-
विद्यार्थ्यांनी खेळाला जीवनाच्या अविभाज्य अंगमना बनवावे, आपल्या दैनंदिन जीवनामध्ये खेळाला, व्यायामाला विशेष वेळ द्यावा असे आवाहन प्राचार्य डॉ.अनिता लोखंडे यांनी महात्मा ज्योतिबा फुले कला महाविद्यालयातील शारीरिक शिक्षण विभाग, खेलो इंडिया धनुर्विद्या सेंटर आष्टी, समाजशास्त्र विभाग विद्यार्थी विकास विभाग तर्फे आयोजित राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित केले. या राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या कार्यक्रमला अध्यक्षस्थानी प्रा डॉ. भारत पांडे तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्राचार्य किशोर पाचभाई,प्रा. डॉ.गणेश खुणे प्रा. डॉ रवी शास्त्रकार प्रा . हर्षा पिसे मैडम यांनी देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यासोबतच कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ.श्याम कोरडे शारीरिक शिक्षण विभाग याने केले यावेळी सर्व प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात आरोग्य राखण्यासाठी समाज व राष्ट्र मजबूत करण्यासाठी पर्यावरण, व्यायाम,योगा, आहार यावर विविध उदाहरणे द्वारा मार्गदर्शन केले

