आदिवासी विकास महामंडळा कडील शिल्लक धान शेतकऱ्यांना बोनस म्हणून वाटप करा - रोहिदास राउत
गडचिरोली -- आदिवासी विकास महामंडळा'कडे शिल्लक राहिलेले धान जिल्ह्यातील शेतकऱ्यांना व दारिद्र्य रेषेखालील लोकांना बोनस म्हणून वाटप करावे आणि या अमूल्य अन्नधान्याला वाया जाण्यापासून वाचवावे अशी मागणी अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाने केली आहे.
मुख्यमंत्री महोदयांना पाठवलेल्या निवेदनात पक्षाचे केंद्रीय उपाध्यक्ष रोहिदास राऊत यांनी म्हटले आहे की, गडचिरोली जिल्हा हा धन उत्पादक जिल्हा म्हणून ओळखल्या जातो. जिल्ह्यात धानाचे मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेतल्या जाते. आदिवासी विकास महामंडळा'मार्फत 'एकाधिकार खरेदी योजने'अंतर्गत दरवर्षी शेतकऱ्यांकडून लाखो क्विंट खरेदी केली जाते . हे धान साठवण्यासाठी जिल्ह्यात पुरेशी गोदामे उपलब्ध नसल्यामुळे, त्यातील मोठा साठा ताडपत्री झाकून उघड्यावर ठेवला जातो. पाऊस व उन्हामुळे हा धान हळूहळू खराब होऊन सडून जातो आणि परिणामी ते फेकून द्यावे लागते आणि हे मौल्यवान अन्नधान्य अखेरीस वाया जाते, याकडे राऊत यांनी लक्ष वेधले आहे.
वारंवार लिलाव करूनही खराब झालेले धान खरेदी करण्यास कोणताही व्यापारी पुढे येत नाही. खरेदी केलेले धान गिरणीत मिलिन्ग साठी पाठवूनही, विविध संस्थांच्या खरेदी केंद्रांवर लाखो क्विंटल धान शिल्लक राहते; असे धान एकतर वाया जाते किंवा अत्यंत कवडीमोल दराने विकावे लागते. ही परिस्थिती जिल्यात दरवर्षी उद्भवते आणि शेतकऱ्यांनी मोठ्या मेहनतीने पिकवलेले मौल्यवान धान शेवटी मातीत मिसळावे लागते या वस्तुस्थिती कडेही निवेदनात लक्ष वेधण्यात आले आहे
हे मौल्यवान धान वाया जाऊ देण्याऐवजी तो शेतकरी किंवा दारिद्र्य रेषेखालील लोकांना वाटप करावा , आणि शतकऱ्यांच्या श्रमाचा सन्मान करावा अशी मागणी 'रिपब्लिकन पार्टी'ने केली आहे.

