अखील भारतीय रिपब्लिकन पक्षाचे वतीने शाहू महाराजांची जयंती साजरी
गडचिरोली (अशोक खंडारे)- महान समाजसुधारक राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाच्या जिल्हा कार्यालयात शुक्रवारी साजरी करण्यात आली.
पक्षाचे केंद्रीय उपाध्यक्ष अशोक निमगडे आणि रोहिदास राऊत यांनी शाहू महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला व दीपप्रज्वलन करून या महान नेत्यास अभिवादन केले.
याप्रसंगी इतर कार्यकर्त्यांनीही शाहू महाराजांना पुष्पांजली वाहिली. या कार्यक्रमास रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष हंसराज उंदीरवाडे, प्रादेशिक उपाध्यक्ष प्रा. प्रकाश दुधे, शहराध्यक्ष अनिल बरसागडे, जिल्हा उपाध्यक्ष शैलेश बांबोडे, कार्यालयीन सचिव अशोक खोब्रागडे, अरुण भैसारे, दादाजी धाकडे, तुळशीदास नंदेश्वर, आणि गजभिये तसेच महिला कार्यकर्त्या सुनीता रायपुरे, प्रमिला रामटेके, व अन्य कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.
नेत्यांनी शाहू महाराजांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला आणि सामाजिक समानता व बंधुभाव जपणारा तसेच शिक्षणाद्वारे आधुनिक विचारांचा प्रसार करणारा समाज घडवण्यासाठी त्यांच्या विचारांचे अनुकरण करण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन केले.

