आष्टी परिसरात एकात्मिक ऊर्जा विकास योजना राबविण्यात यावी-- प्रा. डॉ. भारत पांडे

0

आष्टी परिसरात एकात्मिक ऊर्जा विकास योजना राबविण्यात यावी-- प्रा. डॉ. भारत पांडे  



आष्टी (अशोक खंडारे):-
आष्टी परिसरातील विद्युत समस्या संपूर्णपणे सोडण्याकरिता एकात्मिक ऊर्जा विकास योजना राबवण्यात यावी असे मागणी प्रा. डॉ. भारत पांडे अध्यक्ष ओम विकास बहुउद्देशीय संस्था चंद्रपूर यांनी श्री देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र यांच्याकडे लिखित पत्राद्वारे केलेली होती त्या अनुषंगाने मुख्यमंत्री कार्यालयातून अधीक्षक अभियंता महावितरण गडचिरोली यांच्याकडे पुढील कारवाईसाठी पत्र पाठवण्यात आलेले आहे. आष्टी परिसर सध्या औद्योगिक शहराकडे वाटचाल करीत असून लॉयड्स मेटल कंपनी कोनसरी व त्या संबंधित अनेक उद्योग आष्टी परिसरात येत असल्यामुळे आष्टी परिसरातील लोकसंख्या अफाट वाढत आहे.त्यासोबतच विजेवर आधारित उपकरणाची संख्या देखील वाढत आहे आणि या वाढती लोकसंख्या व विजेचा वापर यानुसार आधुनिक पद्धतीने आष्टी परिसरातील विद्युत विभागात सुधारणा न झाल्यामुळे आष्टी परिसरातील जवळपास 38 गावात ज्या मध्ये चौडमपल्ली, मार्कंडा(कं), कुणघाडा, चपराळा ,ठाकरी , चंदनखेडी (वन)अशा अनेक जंगलव्याप्त परिसरातील भागाचा समावेश होतो. वाढते औद्योगीकरण व लोकसंख्या यानुसार वीज विद्युत विभागात आधुनिकरण व सुधारणा न झाल्यामुळे आष्टी परिसरातील 38 गावातही दररोज वारंवार वीज खंडित होणे, काही ठिकाणी वीज असूनही नसल्यासारखी आहे, वारंवार वीज खंडित होत असल्यामुळे विजेवर आधारित असणारे व्यवसाय आईस्क्रीम, लस्सी थंड पेय विकणारे दुकानदार. त्यासोबतच ऑनलाइन काम करणारे कॅम्प्युटर व्यापारी दैनंदिन कामासाठी पैशाचे व्यवहार करणारे पेटीएम,फोन पे,यूपीआय हे देखील नेट नसल्यामुळे बंद पडणे. त्यामुळे सामान्य नागरिकांना किंवा विद्युत आधारित असलेले उपकरणे फ्रीज, झेरॉक्स,मशीन कपडे धुण्याची मशीन, इन्व्हर्टर, कॅम्प्युटर अशा विद्युत वर चालणाऱ्या साहित्यावर परिणाम होत असून वेळेच्या पहिलेच त्या वस्तू खराब होत आहेतच त्याचबरोबर वारंवार वीज गुल होत असल्यामुळे ऑनलाईन सेवा बँकेचे व्यवहार ठप्प होणे. फोन पे,पेटीएम काम न करणे त्यामुळे ही लोकांच्या दैनंदिन व्यवहार पूर्णपणे विस्कळीत होत आहेत आणि दुर्गम परिसर आहे त्या दुर्गम परिसरात लाईट असूनही नसल्यासारखी आहे आणि त्यामुळे आजही आष्टी परिसरातील जनतेला उच्च दर्जेदार व अखंड विजय सेवा मिळत नाही आणि त्या अनुषंगाने प्रा. डॉ.भारत पांडे ओम विकास बहुउद्देशीय संस्था चंद्रपूर द्वारा अपर सचिव (प्रशासन )मुख्यमंत्री कार्यालय मुंबई येथे प्रत्यक्ष भेटून या विषयाशी संबंधित चर्चा करून आष्टी परिसरासाठी एकात्मिक ऊर्जा विकास योजना राबवण्यात यावी व त्याचबरोबर आष्टी परिसरातील विज विभागाच्या कार्यालयाचे विभाजन करून अडपली येथे एक शाखा निर्माण करण्यात यावी आणि त्याचबरोबर येथील विज विभागात कर्मचारी संख्या कमी असून कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्यात यावी आणि आष्टी परिसरातील जनतेला उच्च व दर्जेदार व अखंडित. विज मिळण्यासाठी अधिक क्षमतेचे मेघा होल्ड बसवून,आष्टी हा परिसर जंगलात असल्यामुळे वारंवार पाऊस,वारा येणे,शिकार होणे यामुळे वारंवार वीज खंडित होते त्यामुळे संपूर्ण भूमिगत वायरिंग, शहरा करता स्वतंत्र फिडर देणे. तसेच भविष्य काळातील वीज विभागात सुधारणा आणि आधुनिक आधुनिकीकरण करण्याचे नियोजन करण्याकरिता एक बैठक बोलवण्यात यावी. व आष्टी परिसरातील सर्वसामान्य जनतेला अखंडित व दर्जेदार वीज देण्याची मागणी प्रा.डॉ. भारत पांडे यांनी पत्राद्वारे केली होती त्या अनुषंगाने मुख्यमंत्री कार्यालयातून लगेच अधीक्षक अभियंता महावितरण गडचिरोली यांच्याकडे पुढील कारवाईसाठी पत्र पाठवण्यात आलेल्याची माहिती देखील प्रा. डॉ. भारत पांडे यांनी दिलेली आहे.
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !