चंदनखेडी (वन) तेथून मार्कंडा (कं) येथे मोहफुलाच्या दारूचा खुलेआम पुरवठा सुरू

0
चंदनखेडी (वन) तेथून मार्कंडा (कं) येथे मोहफुलाच्या दारूचा खुलेआम पुरवठा सुरू 

 तरुण पिढी दारूच्या आहारी – तंटामुक्त समिती कागदावरच!

तंटामुक्त गाव समती, राज्य उत्पादन शुल्क, पोलीस विभागाचे दुर्लक्ष 


आष्टी (अशोक खंडारे ):-
गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील आष्टी पोलीस स्टेशन हद्दीतील चंदनखेडी (वन) येथून  मार्कंडा कंन्सोबा गावात मोहाफुलाच्या दारूचा खुलेआम पुरवठा होत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. काही दारू शौकीन व्यक्ती पेट्रोलचे पैसे आणि एक पाव मोहाची दारू पिण्यासाठी चंदनखेडी गावातून दारू घेऊन येतात व गावातील दारू शौकीनांना दारू पुरवठा करीत असल्याची चर्चा गावात ख़मंग  रंगली आहे व हे वास्तव आहे 
या प्रकारामुळे गावातील तरुण पिढी मोठ्या प्रमाणात दारूच्या आहारी जात असून अनेक कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त होत असल्याची खंत गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे. दिवसभर मजुरी करणारे काही युवक रात्री दारूच्या नशेत धुंद राहत असल्याने घरगुती वाद, भांडणे आणि आर्थिक अडचणी वाढत आहेत.
गावात तंटामुक्त गाव समिती अस्तित्वात असली तरी या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे. तंटामुक्त गाव समिती केवळ कागदावरच कार्यरत असून प्रत्यक्षात दारूबंदीबाबत कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
गावातील सामाजिक कार्यकर्ते आणि ज्येष्ठ नागरिकांनी तंटामुक्त गाव समती, पोलीस प्रशासन, तथा राज्य उत्पादन शुल्क या प्रशासनाने या प्रकाराची चौकशी करून अवैध दारू पुरवठ्यावर तात्काळ आळा घालावा, अशी मागणी केली जात आहे. अन्यथा येणाऱ्या काळात तरुण पिढी पूर्णपणे व्यसनाधीन होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
प्रशासन आणि तंटामुक्त समिती या वाढत्या दारूच्या समस्येकडे लक्ष देणार का? असा सवाल आता ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे. तात्काळ गडचिरोली जिल्ह्यातील सिमेपासून होत असलेला अवैध दारुचा पुरवठा बंद करावा व चंदनखेडी गावातून होणारा पुरवठा बंद करणार कोन असा प्रश्न उपस्थित केला जात आहे
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !