त्यागमुर्ती माता रमाई यांची जयंती पंचशील बुद्ध विहार बर्डी आरमोरी येथे मोठ्या हर्षोल्लासात साजरी

0

त्यागमुर्ती माता रमाई यांची जयंती पंचशील बुद्ध विहार बर्डी आरमोरी येथे मोठ्या हर्षोल्लासात साजरी



आरमोरी (अशोक खंडारे संपादक वैनगंगा वार्ता):

त्यागमुर्ती माता रमाई जयंती यांच्या 128 व्या जयंतीचे आयोजन पंचशील बुद्ध विहार बर्डी आरमोरी तसेच भारतीय बौद्ध महासभा तालूका शाखा आरमोरी यांच्या वतीने साजरी करण्यात आली 
  सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष . आयुष्यमान यशवंत जांभुळकर भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष होते . कार्यक्रमाचे उद्घाटक आयुष्यमती गया ताई घरडे होत्या प्रमुख पाहुणे म्हणून आयुष्यमती चंद्रलेखा बनसोड, राजकूमार देशपांडे, प्रदीपकुमार रोडगे ,प्रेमदास उंदीरवाडे, राजेंद्र मेश्राम, तुंबडे ,. प्रकाश पुणेकर , सिद्धार्थ साखरे, इंदिराताई देशपांडे, रसिकाताई इंदूरकर, आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक अंजलीताई रोडगे यांनी केले यानंतर पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. पाहुण्यांचे स्वागत झाल्यानंतर माता रमाई यांच्या जीवन कार्यावर आयुष्यमती मीना सहारे यांनी सूंदर असं गीत गायले यानंतर सर्व पाहुण्यांनी माता रमाई यांच्या जीवन कार्यावर मार्गदर्शन केले. यावेळी सर्व बौद्ध उपासक व उपासीका तसेच बालगोपाल . पंचशील बुद्ध विहाराचे कार्यकर्ते व भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते.अशा प्रकारे कार्यक्रम पार पडला.यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आयुष्यमती मीना सहारे यांनी केले तर आभार प्रदर्शन योजना मेश्राम यांनी केले.
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !