महाशिवरात्री निमित्त मार्कंडा (देव) येथे पाच दिवस मोफत भोजनदान
दरवर्षी प्रमाणे दिवाकर पेंदाम यांचा याही वर्षी उपक्रम
गडचिरोली (अशोक खंडारे):-
विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील मार्कंडा देव येथे महाशिवरात्री निमित्त मोठी यात्रा भरत असते त्या ठिकाणी दरवर्षी प्रमाणे यंदाही पाच दिवस मोफत भोजनदान देण्यात येणार आहे
गोंडवाना आदिवासी स्वायत्त परिषद व गोंडवाना गोंड महासभा जिल्हा चंद्रपूर/गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने मा दिवाकर पेंदाम माजी सैनिक यांच्या माध्यमातून लाखो भक्तजना करीता दि.१५ फेब्रुवारी ते १९ फेब्रुवारी या पाच दिवस दत्त मंदिराचे पुढे मोफत भोजनदान देण्यात येणार आहे त्याकरिता स्वइच्छेने ज्या दानदात्यांना दान करायचे असल्यास ९४२२८३९२३५ यावर संपर्क साधावा
दरवर्षी हा सृत्य उपक्रम राबविण्यात येत असल्याने दिवाकर पेंदाम यांचे सर्वत्र कौतुक होत आहे

