आष्टी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी दिपक रॉय तर सचिवपदी सुधीर फरकाडे
आष्टी( प्रतिनिधी) ग्रामीण पत्रकार संघ आष्टीची सर्वसाधारण सभा येथील विश्राम गृहामध्ये घेण्यात आली. याप्रसंगी विविध विषयांवर सकारात्मक चर्चा घडून आली .
लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकार यांच्या माध्यमातून समाजातील अनेक समस्या सोडविण्याचा व अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी पत्रकारांची भूमिका महत्वाची ठरली आहे. अशा विविध समस्या संघटनेच्या माध्यमातून सर्वांसमोर आणली जाते त्यासाठी पत्रकार संघ मोलाचे कार्य करते.या उद्देशाने याच सभेमध्ये २०२६ - २७ साठी नवीन कार्यकारिणीची निवड करण्याचे ठरविण्यात आले. त्यानुसार सर्वानुमते नवीन कार्यकारिणी तयार करण्यात आली.यात
अध्यक्ष म्हणून दिपक रॉय यांची तर सचिवपदी सुधीर फरकाडे यांची निवड करण्यात आली.
उपाध्यक्ष - अशोक खंडारे , सहसचिव - संजय भोयर , कोषाध्यक्ष - गणेश शिंगाडे , सदस्य - भास्कर फरकडे , संदीप जोरगलवार यांची निवड झाली.
ही कार्यकारिणी एक वर्षासाठी असून १५ जानेवारी २०२६ ते १४ जानेवारी २०२७ पर्यंत कालावधी राहील असे ठरविण्यात आले..

