महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजीत पवार यांनी घेतली शपथ

0
महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजीत पवार यांनी घेतली शपथ 


मुंबई:   सुनेत्रा अजित पवार यांनी आज महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. लोकभवन येथील दरबार हाॅल सभागृहातील छोटेखानी कार्यक्रमात राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी सुनेत्रा पवार यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यानिमित्ताने सुनेत्रा पवार या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरल्या आहेत. 

याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री- एकनाथ संभाजी शिंदे यांच्यासह राज्य मंत्रिमंडळातील मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उपस्थित होते.

अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर त्यांच्या जागी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. 

तत्पूर्वी सुनेत्रा पवार यांनी आपल्या राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा उपराष्ट्रपती सी_पी_राधाकृष्णन यांच्याकडे पाठवून दिला. त्यानंतर, मुंबईतील विधानभवनात राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधीमंडळ पक्षाची बैठक पार पडली. या बैठकीत सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या नेते पदी निवड करण्यात आली. तसेच पक्षाबाबतचे निर्णय घेण्याचे सर्वाधिकारही त्यांच्याकडे सोपविण्यात आले. 

विधानभवनातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या बैठकीत एकमताने हा निर्णय करण्यात आला. या बैठकीनंतर तातडीने राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी वर्षा निवासस्थान गाठत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत पक्षाने केलेल्या ठरावाची माहिती दिली. त्यानुसार अजित पवारांकडील उपमुख्यमंत्री पदी नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला. पाठोपाठ लोकभवनात छोटेखानी शपथविधी सोहळा पार पडला आणि सुनेत्रा पवार या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री बनल्या.
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !