नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीची मदत द्या शिवसेनेची ( शिंदे गट) जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी
गडचिरोली (अशोक खंडारे):-
गेल्या तीन ते चार दिवसांपासून गडचिरोली जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे जिल्हयातील धान, कापूस व ईतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सध्या जिल्ह्यात धान कापणीचा हंगाम सुरु आहे व कापूस तोडणीला सुद्धा आलेला आहे.या अवकाळी पावसामुळे धान व कापसाचे हातातोंडाशी आलेले पीक पूर्णतः वाया गेले आहे. जिल्ह्यातील फार मोठया लोकसंख्येचा उदरनिर्वाह शेतीवर आधारित असून या नुकसानीमुळे शेतकऱ्यांवर फार मोठे संकट ओढवले आहे. त्यामुळे नुकसान झालेल्या शेतपिकांचे तात्काळ पंचनामे करण्याचे निर्देश देवून गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी शिवसेना शिंदे गटाने 27 ऑक्टोंबर सोमवारी निवासी जिल्हाधिकारी सुनील सुर्यवंशी यांच्याकडे निवेदन देवून केली. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख राकेश बेलसरे, सहसंपर्क प्रमूख हेमंत जम्बेवार, युवा सेना जिल्हा प्रमुख दिपक भारसाकडे, सोशल मीडिया प्रसिध्दी प्रमुख कृष्णा वाघाडे आदी उपस्थित होते

