वाघाच्या हल्ल्याने संतप्त नागरिकांचं चक्काजाम आंदोलन
गावकऱ्यांचं ऐतिहासिक एकत्रीकरण!
गोंडपिपरी:-
चेकपिंपरी व गणेशपिपरी येथे आठ दिवसांच्या कालावधीत दोन नागरिकांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला.या घटनेमुळे गावकऱ्यांमध्ये तीव्र संताप पसरला असून, नरभक्षक वाघाला तात्काळ पकडण्यात यावे,या मागणीसाठी गोंडपिपरी–अहेरी राष्ट्रीय महामार्गावर आज तब्बल आठ तासांचा रास्ता रोको आंदोलन करण्यात आला.
हे आंदोलन कोणत्याही पक्षाशी किंवा नेत्याशी संबंधित नव्हते — हे शुद्धपणे ग्रामस्थांचं आंदोलन होतं,त्यांच्या जिवाभावाच्या सुरक्षेसाठी उभं राहिलेलं.
या आंदोलनाला शहरातील व्यापारी बांधवांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. गावात बाजारपेठ पूर्णपणे बंद ठेवून त्यांनी शेतकरी आणि ग्रामस्थांच्या दु:खात हातभार लावला.सोबतच तालुक्यातील सर्व सामाजिक कार्यकर्त्यांनी सर्व पक्षीय नेत्यांनी कार्यकर्त्यांनी देखील आंदोलनाला बळ दिलं.सकाळपासून आंदोलन संपेपर्यंत बाजारपेठ शंभर टक्के बंद होती — ही एकता खरंच कौतुकास्पद आणि प्रेरणादायी आहे.
गावकऱ्यांच्या संघटित प्रयत्नांमुळे आजचं आंदोलन यशस्वी ठरलं,आणि प्रशासनासमोर लोकांच्या मागण्यांचा ठाम आवाज पोहोचवण्यात ग्रामस्थांनी आपलं सामर्थ्य दाखवून दिलं.

