विदर्भ निर्माण जनसंकल्प मेळावा
१२ ऑक्टोबर ला गडचिरोलीत.
गडचिरोली - विदर्भ राज्य आंदोलन समिती गडचिरोलीच्या वतीने विदर्भ निर्माण जनसंकल्प मेळावा दि. १२ ऑक्टोंबर २०२५ रोज रविवार ला दुपारी १२ वाजता यमुना हॉल पोटेगांव रोड गडचिरोली येथे आयोजित करण्यात आलेला आहे.
दहा लाख कोटी कर्जाच्या ओझ्या खालीच्या दबलेल्या महाराष्ट्रात विदर्भातील लोकांना काय भविष्य आहे, शिक्षणाचा अनुशेष, आरोग्य सुविधांचा अनुशेष, चांगल्या रस्त्यांचा अनुशेष, वैद्यकीय शिक्षण तंत्रशिक्षणाचा अनुशेष, सिंचनाचा अनुशेष, उद्योगाचा अनुशेष, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, रोजगारासाठी युवकांचे स्थलांतर यात भर राज्यावर दहा लाख कोटींचं कर्ज अशा परिस्थितीत विदर्भाचा विकास होणार काय यावर एकच उत्तर विदर्भाच्या जनतेच्या मनातील स्वतंत्र विदर्भ राज्य याकरिता पूर्व विदर्भातील गावागावात स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी पोहोचविण्यासाठी पूर्व विदर्भातील चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यातील जनतेपर्यंत विदर्भ राज्य मागणीचे महत्त्व प्रभावीपणे समजावून सांगण्यासाठी पूर्व विदर्भाचा विदर्भ राज्य निर्माण जनसंकल्प मेळावाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
सदर जनसंकल्प मेळाव्याचे उदघाटक म्हणून विदर्भ आंदोलन समितीचे अध्यक्ष माजी आमदार वामनराव चटप तर प्रमुख मार्गदर्शक म्हणुन पूर्व विदर्भ अध्यक्ष अरुणभाऊ केदार , उपाध्यक्ष सुनिल चोखारे,,दै.देशोन्नतीचे मुख्य संपादक प्रकाशभाऊ पोहरे,अर्थतज्ञ डॉक्टर श्रीनिवास खांदेवाला, पश्चिम विदर्भ अध्यक्ष डॉ. पि.आर राजपुत,ॲड . सुरेश वानखेडे,,महिला अध्यक्ष रंजनाताई मामर्डे,युवा आघाडीचे मुकेश मासुरकर उत्तर जिल्हाध्यक्ष राजेंद्रशिह ठाकुर , दक्षिण जिल्हाध्यक्ष अशोक भाऊ पोरेड्डीवार, जिल्हा समन्वयक अरुण पा. मुनघाटे, घिसु पा. खुणे, रमेश उपलवार, महिला आघाडी अध्यक्ष अमिता मडावी, डॉ.चंद्रशेखर डोंगरवार, प्रा. मुनिश्वर बोरकर,रमेशजी भुरसे, पांडुरंगजी घोटेकर,गोपाल रायपुरे, भोजराज कान्हेकर आदिची प्रमुख उपस्थिती राहणार असुन सदर संकल्प मेळाव्यास बहुसंख्येनी सहकाऱ्यासह उपस्थित राहून मेळावा यशस्वी करावा आणि वेगळा विदर्भाची मागणी पुर्ण करावी असे आवाहन दशरथ साखरे, मारोती भैसारे,प्रमोद राऊत,नाशिर जुमुन शेख ,महानंदा आतला, पांडुरंग नागापुरे, चंद्रकांत शिवणकर, मोतीराम लाटेलवार, चोखोबा ढवळे, माधुरी गावळे,कांता हलामी, मुत्ताजी दुर्गे, विशाल दहिवले,प्रमोद सरदारे, गुरुदेव भोपये, वेनुदास वाघरे, तुळशीदास सहारे आदिनी एका पत्रकातून केले आहे .

