इल्लूर येथील एका इसमाची गळफास घेऊन आत्महत्या

0
इल्लूर येथील एका इसमाची गळफास घेऊन आत्महत्या 



आष्टी( प्रतिनिधी)## चामोर्शी तालुक्यातील इल्लूर येथील एका इसमाने शेतामध्ये झाडाला फाशी लावून आत्महत्या केली.ही घटना ९ तारखेला दुपारी २ ते ३ वाजताच्या सुमारास घडली.
मयत इसमाचे नाव प्रभाकर शंकर आत्राम , वय ४३ वर्ष, रा. इल्लूर असे आहे.
मृतक इसमला दारु पिण्याची सवय असल्याने घरी कुणाही नसतांना दारुच्या नशेत गावापासून ३किमी अंतरावर असलेल्या शेतातील सागवानाच्या झाडाला नायलॉन दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली.
फिर्यादी अशोक तोरे , वय ३२ वर्षे, व्यवसाय वाहन चालक यांच्या रिपोर्ट वरून पोलिसांनी मर्ग दाखल केला व घटनेचा पंचनामा करण्यात आले.
मयताचे आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.
पुढील तपास पोलिस निरीक्षक विशाल काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार जोगेश्वर वाकुडकर , व रोहित काळे करीत आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !