लॉयड्स मेटल कोनसरी तर्फे म. ज्यो. फुले हायस्कूल आष्टीच्या विद्यार्थिनींना सायकलचे वाटप
आष्टी:-
महात्मा ज्योतिबा फुले हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय आष्टी या ठिकाणी लाॅयड्स मेटल कोनसरी अंतर्गत येत असणाऱ्या गौन खनिज विभागामार्फत महात्मा ज्योतिबा फुले हायस्कूल च्या वर्ग आठवीतल्या 14 विद्यार्थिनींना सायकलचे वाटप करण्यात आले. सायकल वितरण कार्यक्रमाचे अध्यक्ष महात्मा ज्योतिबा फुले हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय आष्टीचे प्राचार्य किशोर पाचभाई होते तर प्रमुख अतिथी म्हणून शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय गडचिरोलीचे प्राचार्य विशाल नितनवरे, प्रा. जहीर हकीम, प्रा.चेतन निखारे, प्रा. एच. मांझा, पर्यवेक्षक घाटबांधे हे होते. याप्रसंगी प्राचार्य नितनवरे विद्यार्थिनींना शुभेच्छा दिल्या व विद्यार्थांच्या शिस्तीचे भरभरून कौतुक केले.प्रा. जमीर हकीम यांनी सायकल मुळे होणाऱ्या वेळेच्या बचतीचा. आपल्या अभ्यासाच्या प्रगतीकरीता जास्तीत जास्त उपयोग करून घ्या असे मोलाचे संबोधन केले. अध्यक्ष स्थानावरून बोलताना किशोर पाचभाई सरांनी विद्यार्थ्यांना कर्तव्यदक्ष होण्याचा मोलाचा संदेश दिला. सायकल प्राप्त झाल्यानंतर विद्यार्थिनिंच्या
च्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता. व विद्यार्थिनींनी लाॅयड्स मेटल कोनसरी गौण खनिज विभागाचे मनोमन आभार मानले. कार्यक्रमात यावेळी शिक्षक अंजली कोडमलवार,नंदा मिलमिले,संदीप पोरेड्डीवार, अनिल पिसे,श्रीनिवासन वेनमपल्ली,राजेश अंबिलपू, विनोद भूरसे, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमधून कनिष्ठ लिपिक राजेश बर्लावार, शिपाई लक्ष्मण दुरशेट्टी, बंडू दडजांम,योगेश दिवटेवार व विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंक्लेश रोहनकर तर आभार प्रदर्शन सुशील अवसरमोल यांनी केले.

