बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे जन्मशताब्दी वर्षानिमित्त गडचिरोली येथे भव्य कार्यकर्ता मेळावा

0
बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे जन्मशताब्दी वर्षानिमित्त गडचिरोली येथे भव्य कार्यकर्ता मेळावा 


मेळाव्यात जेष्ठ आंबेडकरी कार्यकर्ते यांचा सत्कार 


गडचिरोली (अशोक खंडारे):-
बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त अखिल भारतीय रिपब्लिकन पक्ष जिल्हा गडचिरोली यांच्या तर्फे भव्य कार्यकर्ता मेळावा तसेच जेष्ठ आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे 
सदर कार्यक्रम दि. २५ सप्टेंबर २०२५ ला केमीष्ट भवन गडचिरोली ठिक ११.०० वाजताच्या सुमारास आयोजित करण्यात आला आहे 
कार्यक्रमाचे अध्यक्ष अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष हंसराज उंदिरवाडे, तर प्रमुख अतिथी म्हणून अभारीप चे के़द्रीय उपाध्यक्ष मा. रोहीदास राऊत, राज्य उपाध्यक्ष कुलपती मेश्राम, प्रदेश उपाध्यक्ष प्रा. प्रकाश दुधे, प्रदेश सचिव प्रा. राजन बोरकर, जेष्ठ नेते डॉ ‌हरिदास नंदेश्वर, प्रदेश सचिव केशवराव सामृतवार, विधानसभा प्रभारी प्रदिप भैसारे, महीला आघाडी प्रदेश उपाध्यक्ष सुरेखाताई बारसागडे, जिल्हा अध्यक्ष महीला आघाडी व
निताताई सहारे, युवा आघाडी जिल्हाध्यक्ष नरेंद्र रायपुरे, आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत 
जिल्ह्यातील अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हा सरचिटणीस प्रल्हाद रायपुरे, महीला आघाडी जिल्हा सरचिटणीस ज्योती उंदिरवाडे, कार्यालयीन सचिव अशोक खोब्रागडे, शहर अध्यक्ष अनिल बारसागडे, महीला आघाडी शहर अध्यक्ष वनमाला झाडे यांनी केले आहे

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !