चिटुगुंटा (लगाम) येथे लॉयड्स मेटलची वाहतूक करणाऱ्या ट्रकने चिरडले एका इसमास
लॉयड्स मेटल ॲंड एनर्जी लिमिटेड कंपनी अजून किती जीव घेतल्यानंतर शासनास येणार जाग ?
वैनगंगा वार्ता/ तालुका प्रतिनिधी श्रीकृष्ण गावडे
लाॅयड्स मेटल ॲंड एनर्जी लिमिटेड कंपनी सुरजागड येथील लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रकने चिटूगूटा (लगाम) येथील एका निरपराध व्यक्तीस दि .२० सप्टेंबर ला दुपारच्या सुमारास चिरडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला
प्राप्त माहितीनुसार
मुलचेरा तालुक्यातील लगाम चिटूगुंठा येथील दशरथ सिताराम आत्राम रा. चुटूगुंठा हा काही खासगी कामाने पायदळी रोडने जात असताना सुरजागड येथून लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रकने त्या व्यक्तीस चिरडले त्यामुळे जागीच मृत्यू झाला.
सदर अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतकाचे शव रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी पाठविले अपघात स्थळावरुण ट्रकचालकाने ट्रक पळवून नेल्याने त्याचा शोध घेण्यासाठी पोलीसानी आष्टी येथे अडवून चौकशी करीत होते
मृतकाचे कुटुंबांना कंपनीकडून एक करोड रुपये द्यावे त्याच्या कुटुंबाचे पालन पोषण करावे अन्यथा तुमच्या ट्रकांना आग लावून पेटवून देऊ अशी मागणी परिसरातील जनतेनी केली आहे
लॉयड्स मेटल ॲंड एनर्जी लिमिटेड कंपनी अजून किती लोकांचे जीव घेणार खमनचेरू, बोरी,शांतीग्राम,लगाम, मार्कंडा, चौडमपल्ली,धनुर, चंदनखेडी, आष्टी, येथे नेहमी अपघात होत असतात सर्वसामान्य जनतेला नाहक जीव गमावा लागत आहे
याकडे शासन आणि प्रशासन हेतू परस्पर दुर्लक्ष करीत आहेत अजून किती जीव घेतल्यानंतर शासनास जाग येणार आहे
या परिसरातील जनतेला जीव मुठीत घालून या रोडने प्रवास करावा लागत आहे.
याकडे कुणाचेही लक्ष नाही तरी जनतेकडून कडकडीची विनंती आहे की या रोडने जाणारे ट्रक थांबवा अन्यथा मोठा आंदोलन उभारून सामान्य जनता रोडवर उतरून या लोह वाहतूक करणाऱ्या ट्रकांना थांबवून त्यांच्यावर डिझेल पेट्रोल ओतून जाळून टाकल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही.
असे ग्रामवाशीयांचे म्हणने आहे

