महात्मा ज्योतिबा फुले हाय.आष्टी येथे हिंदी काव्यवाचन प्रतियोगिता संपन्न

0
महात्मा ज्योतिबा फुले हाय.आष्टी येथे हिंदी काव्यवाचन प्रतियोगिता संपन्न   


आष्टी (अशोक खंडारे):-
  १४ सप्टेंबर हिंदी दिवसाच्या निमित्ताने महात्मा जोतीबा फुले हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय आष्टी या ठिकाणी हिंदी दिवस साजरा करण्याच्या निमित्ताने हिंदी काव्य वाचन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक किशोर पाचभाई व प्रमुख पाहुणे म्हणून पर्यवेक्षक घाटबांधे, व्ही.आय.पोलोजी व सुशील अवसरमोल  हे उपस्थित होते. महात्मा ज्योतिबा फुले हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांच्या कौशल्याने स्वनिर्मित हिंदी कविता वाचून दाखवल्या व विद्यार्थी प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळवला. काही विद्यार्थ्यांनी कवितांचे वाचन केले. शिक्षकांनी सुद्धा आपले कौशल्य पणाला लावून कविता सादर केल्या. त्याचबरोबर मुख्याध्यापक किशोर पाचभाई व मान्तेश रत्नावार यांनी मिळून हिंदी अनुवादित भारूड साभिनय सादर केले. त्याला विद्यार्थ्यांनी भरभरून दाद दिली. या कार्यक्रमाला उपस्थित अनिल पिसे, अंक्लेश रोहनकर, विनोद भूरसे, राजेशम अंबिलपू, संदीप शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमधून कनिष्ठ लिपिक राजेश बर्लावार, शिपाई लक्ष्मण दुरशेट्टी, बंडू दडजाम हो योगेश दिवटेवार हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक सुशील अवसरमोल  यांनी केले. अंजली कोडमलवार, नंदा मिलमिले यांनी या हिंदी काव्य स्पर्धेचे परीक्षण केले. संचालन मान्तेश रत्नाकर यांनी केले व आभार  वेनमपल्ली यांनी मानले

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !