गडचिरोली जिल्ह्यातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या आष्टी तालुक्याची निर्मिती करा- शिवसेना ( शिंदे) जिल्हा प्रमुख राकेश बेलसरे यांनी निवेदनाद्वारे केली मागणी
गडचिरोली (अशोक खंडारे संपादक वैनगंगा वार्ता १९):-
ना. आशिष जयस्वाल वित्त नियोजन कृषी, मदत व पुनर्वसन, विधी व न्याय कामगार राज्यमंत्री हे गडचिरोली जिल्ह्यात आले असता गडचिरोली जिल्हा शिवसेना (शिंदे) यांनी निवेदन देऊन चामोर्शी तालुक्याचे विभाजन करून स्वतंत्र आष्टी तालुका निर्माण करावा अशी मागणी केली आहे
मागील २० ते २५ वर्षापासून आष्टी तालुक्याची निर्मिती व्हावी याकरीता परिसरातील नागरिक संघर्ष करीत आहेत. आष्टी हे गाव गडचिरोली जिल्ह्यातील मध्यवर्ती महत्त्वाचे गाव असून १० हजाराहून अधिक लोकसंख्येचे गाव आहे. या तालुक्याची निर्मिती केल्यास आष्टी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ५० ते ६० गावांचा समावेश आहे. येथुन तालुक्याचे ठिकाण असलेल्या चामोर्शीचे अंतर ४० ते ५० किलोमिटर इतके आहे त्यामुळे या परिसरातील नागरिकांना कार्यालयीन कामासाठी तालुका मुख्यालयी जाण्यासाठी गैरसोयीचे ठरत आहे एका दिवसात होणाऱ्या कामाकरीता दोन ते तीन दिवस येरझारा माराव्या लागतात
त्यामुळे नागरिकांना शारिरीक, मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे. लोहखनिजावर आधारित जिल्हयातील स्टील प्रकल्प असलेल्या कोनसरी या गावाचे अंतर आष्टी येथुन केवळ नऊ किलोमीटर आहे तसेच आष्टी येथे पेपर मील उद्योग प्रकल्पही आहे शाळा, महाविद्यालये, बिएड महाविद्यालय तथा राष्ट्रीयकृत बँका सुद्धा आहेत महसूलाच्या बाबतीत परिसर सुसम्पन्न आहे या सर्व बाबींचा विचार करून चामोर्शी तालुक्याचे विभाजन करून आष्टी तालुक्याची निर्मिती केल्यास या भागाचा विकास होण्यास मदत मिळेल. आष्टी तालुका निर्माण व्हावा याकरीता आजपर्यंत अनेक मोठे आंदोलने करण्यात आली असून याबाबतचे निवेदनही शासन स्तरावर दिलेले आहे.
तरी गडचिरोली जिल्ह्यातील व आष्टी परिसरातील नागरिकांची भावना लक्षात घेता चामोर्शी तालुक्याचे विभाजन करून आष्टी तालुक्याची निर्मिती करावी अशी मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख राकेश बेलसरे यांनी केली आहे
निवेदन देण्यात आले त्यावेळी ग्रामपंचायत सदस्य कपील पाल, ग्रामपंचायत सदस्य संतोष बारापात्रे,अमोल पंदिलवार, मोहन आचेवार, रोहन रायपुरे,राजू येडलावार,अंतू तांगडे,शुभम औतकार, अजय कारेवार,स्वप्नील फरकडे,सागर निखाडे, आतिश कोसरे आदिंसह कार्यकर्ते उपस्थित होते

